मतदानाच्या दिवशी बहिणीचा प्रचार केल्याच्या आरोपात सोनू सूदवर FIR दाखल

सोनूविरोधात (Sonu Sood) मोगा शहर पोलीस ठाण्यात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sonu Sood
Sonu SoodDainik Gomantak

पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान सोनू सूद मतदान केंद्रावर दिसल्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याची कार जप्त केली होती. त्यानंतर, सोनू सूद मोगाच्या लांडेके गावात त्याच्या बहिणीसाठी प्रचार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अभिनेत्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. सोनूविरोधात (Sonu Sood) मोगा शहर पोलीस ठाण्यात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, सोनू सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे आणि तिथे एका रिअॅलिटी टीव्ही शोचे शूटिंग करत आहे. (Sonu Sood Latest News Update)

अभिनेत्याची बहीण मालविका सूद सच्चर या मोगामधून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होत्या. मतदानाच्या दिवशी सोनूची कार जप्त करून अभिनेत्याला घरी पाठवण्यात आले. सोनू मतदारांवर प्रभाव टाकत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याला मोगा येथील मतदान केंद्रावर जाण्यास मनाई केली होती.

Sonu Sood
रोमँटिक रिलेशनशिपबद्दल अनन्या पांडे काय म्हणाली तुम्हाला माहीतीये का?

सोनूने मात्र मतदान केंद्रावर निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. एएनआयशी बोलताना सोनू म्हणाला, “आम्हाला विरोधकांकडून अनेक धमकीचे फोन आले होते. अनेक बूथवर पैसेही वाटले जात होते. त्यामुळे निवडणूक योग्य पद्धतीने पार पडली आहे का, हे पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. म्हणूनच आम्ही तिथे गेलो. आता या प्रकरणात सोनूचे काय होणार, हे येत्या काही दिवसांत कळेलच. तसेच या तक्रारीवर चाहते सोनूच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.

सोनूच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तो आचार्य, थमिलरासन या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हा तेलुगु आणि तामिळ दोन्ही चित्रपट आहे. याशिवाय तो पृथ्वीराज आणि फतेह या हिंदी चित्रपटांमध्येही दिसणार आहे. पृथ्वीराजमध्ये सोनूसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट वादांमुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला करणी सेनेचा विरोध असून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com