Viral Video : अरे देवा! असं काय झालं की चक्क विमानात दोघांनी सुरू केली हाणामारी; पाहा हा व्हायरल व्हिडिओ

बँकॉक ते कोलकाता या आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये दोन भारतीय प्रवाशांमध्ये अचानकच जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर भांडणात झाले.
Viral Video of Flight Fight
Viral Video of Flight FightDainik Gomantak

बँकॉक ते कोलकाता या आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये दोन भारतीय प्रवाशांमध्ये अचानकच जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर भांडणात झाले.

भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात थाई स्माईल एअरवेच्या फ्लाइटमधील दोन पुरुष वाद घालताना दिसत आहेत, तर एअर होस्टेस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. (Viral Video of Flight Fight)

काही क्षणांनंतर, एक माणूस "हाथ नीचे रख" म्हणतो आणि सतत कानाखाली मारू लागतो. त्याचे रूपांतर हाणामारीत होते. एका क्षणी, फ्लाइट अटेंडंट मायक्रोफोनवर "थांबा" असे म्हणत ते तर इतर लोक त्यांच्यामध्ये येऊन भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या बाचाबाचीत आणखी काही प्रवासीही सामील झाले. भांडणाचे कारण स्पष्ट झाले नाही.

कशामुळे झाला वाद ?

प्रवाशाने केबिन क्रूच्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्यास नकार दिल्यानंतर बँकॉक-इंडिया फ्लाइटमध्ये हाणामारी सुरू झाली. थाई स्माईल एअरवेजने या प्रकरणातील एका घटनेच्या अहवालात म्हटले आहे की ही घटना 26 डिसेंबर रोजी थायलंडहून कोलकाता-जाणाऱ्या विमानाने उड्डाण करण्यापूर्वी घडली.

इथे पाहा व्हिडिओ :

क्रूने प्रवाशांना टेक-ऑफसाठी त्यांच्या जागा सरळ स्थितीत समायोजित करण्यास सांगितले. एक माक सुरक्षा प्रोटोकॉल फ्लाइट्समध्ये पाळला जातो. एका प्रवाशाने पाठदुखीचे कारण देत सीट समायोजित करण्यास नकार दिला, असे घटनेच्या अहवालात म्हटले आहे.

भारतातील नागरी विमान वाहतूक सुरक्षेसाठी नियामक प्राधिकरण ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) नेही गुरुवारी या प्रकरणाची दखल घेतली.

BCAS DG झुल्फिकार हसन म्हणाले, “आम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेतली आहे ज्यात कोलकात्याला जाणाऱ्या थाई एअरवेजच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांमध्ये भांडण होत आहे. बीसीएएसने संबंधित प्राधिकरणाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. यासंबंधी पुढील कारवाई करायची असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com