Farmers Protest: शेतकऱ्यांचा आज भारत बंदचा 'एल्गार'

10 महिन्यांपासून आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या (Farmers Protest) संयुक्त किसान मोर्चाने संपूर्ण देशाला हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे
Farmers Protest: Farmers call for India shutdown against Farm laws
Farmers Protest: Farmers call for India shutdown against Farm lawsDainik Gomantak
Published on
Updated on

संयुक्त किसान मोर्चाने (Samyukta Kisan Morcha) तीन कृषी कायद्यांच्या (Agriculture Bill) विरोधात आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. या बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबाही मिळाला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आंदोलकांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. एकीकडे शेतकरी (Farmers Protest)नेते सांगत आहेत की सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावीत तर दुसरीकडे सरकारच्या बाजूने पुन्हा एकदा संवादाची दारे खुली होतील असे सांगण्यात आले आहे.(Farmers Protest: Farmers call for India shutdown against Farm laws)

सरकारची पुन्हा चर्चेची तयारी

कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आजच्या भारत बंद बद्दल बोलताना मला शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग सोडून संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करायचे आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपावर सरकार विचार करण्यास तयार आहे. यापूर्वी अनेक वेळा याबद्दल बोलले गेले आहे. जर काही शिल्लक असेल तर सरकार नक्कीच बोलण्यास तयार आहे असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

अत्यावशक सेवेसह या गोष्टी सुरूच राहतील

10 महिन्यांपासून आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने संपूर्ण देशाला हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. भारत बंद सकाळी 6 पासून सुरू झाला आहे आणि संध्याकाळी 4 पर्यंत चालू राहील. रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, मदत आणि बचाव कार्यासह सर्व अत्यावश्यक सेवा आणि परीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना या बंदमधून सूट असेल तर अनेक बँक संघटनाही या भारत बंदला पाठिंबा देत आहेत.

Farmers Protest: Farmers call for India shutdown against Farm laws
'गुलाब' चक्रीवादळाची आंध्र प्रदेशातील किनारपट्टीला दस्तक देण्यास सुरुवात

आजच्या बंदला देशातील जवळपास सर्व पक्षांचा पाठींबा

या आंदोलनाला राजकीय पक्षांचाही पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस, सपा, बसपा, आप, द्रमुक, राजद, डाव्या पक्षांसह अनेक विरोधी पक्षांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.काँग्रेसने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भारत बंदमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह भोपाळमध्ये धरणे देतील, तर बिहारमध्येही महाआघाडी सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार आहे .

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनीही बंदच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे, "पंजाब काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. योग्य आणि चुकीच्या लढाईत आपण तटस्थ राहू शकत नाही." अशे मत त्यांनी मांडत या आंदोलनाला पंजाब काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला, यूपी-पंजाबसह पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकीत शेतकरी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. म्हणूनच प्रत्येक राजकीय पक्षाला शेतकऱ्यांशी जोडायचे आहे. आता हा बंद कुठे यशस्वी होतो आणि कुठे अयशस्वी होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर दुसरीकडे आजच कोर्ट दिल्लीत ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे त्याठिकाणचे रस्ते खुले करण्यावर आज सुनावणी करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com