Farmers Protest: ''PM मोदींच्या लोकप्रियतेचा ग्राफ खाली आणावा लागेल...'', शेतकरी नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

Farmer Leader Jagjit Singh Dallewal: शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. सरकारने त्यांचे कर्ज माफ करावे आणि एमएसपीची हमी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
Farmer Leader Jagjit Singh Dallewal
Farmer Leader Jagjit Singh DallewalDainik Gomantak
Published on
Updated on

Farmer Leader Jagjit Singh Dallewal:

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. सरकारने त्यांचे कर्ज माफ करावे आणि एमएसपीची हमी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनात भारती किसान युनियन (एकता सिद्धूपूर) नावाचा एक पक्ष सहभागी होत आहे. जगजीत सिंग डल्लेवाल असे या संघटनेच्या प्रमुखाचे नाव असून त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत आहे, ज्याने मोठी खळबळ उडवून दिली.

वास्तविक, डल्लेवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या आंदोलनाच्या हेतूवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रत्यक्षात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जगजीत सिंह डल्लेवाल म्हणताना दिसत आहेत की, राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यानंतर पीएम मोदींच्या लोकप्रियतेचा ग्राफ खाली आणण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध सुरु झाला आहे.

Farmer Leader Jagjit Singh Dallewal
Sugarcane Farmers Protest: ....त्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही! संतप्त ऊस उत्पादकांचा आक्रमक पवित्रा

पीएम मोदींचा ग्राफ खाली आणण्याचा प्लॅन

डल्लेवाल म्हणाले की, राम मंदिरानंतर पीएम मोदींच्या लोकप्रियतेचा ग्राफ खूप वाढला आहे. खूप कमी वेळ आहे. त्यांचा हा लोकप्रियतेचा ग्राफ खाली आणायला हवा. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी आला होता, जेव्हा शेतकरी (Farmer) आंदोलन सुरु करणार होते. डल्लेवाल यांच्या टिप्पणीला उत्तर देताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, हे राजकीय वक्तव्य आहे. एवढ्या मोठ्या आंदोलनाचे आयोजन केले तर लोक पीएम मोदींना पाठिंबा देणे बंद करतील का? निषेध करण्याचा हा योग्य मार्ग नाही, असा संदेश जनतेमध्ये पसरत आहे.

Farmer Leader Jagjit Singh Dallewal
Farmer Protest: राकेश टिकैत यांना गाझीपूर सीमेवर अटक, BKU कार्यकर्त्यांमध्ये रोष

काय म्हणाले सीएम खट्टर?

खट्टर म्हणाले की, 'शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला आहे, तो योग्य नाही.' ते आक्रमक सैन्याप्रमाणे दिल्लीकडे कूच करु पाहत असल्याची टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, ''शेतकरी एका वर्षासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली, अर्थ-मूव्हर आणि रेशन घेऊन सैन्याप्रमाणे पुढे जात आहेत.'' दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या शेतकऱ्यांबाबत खट्टर पुढे म्हणाले की, ''त्यांच्या पद्धतीवर आमचा आक्षेप आहे. त्यांच्या दिल्लीला जाण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही. तुम्ही ट्रेन, बस आणि तुमच्या स्वतःच्या वाहनाने तिथे जाऊ शकता. पण ट्रॅक्टर हे वाहतुकीचे साधन नाही. हे एक कृषी उपकरण आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com