शेतीत खोदकामावेळी शेतकऱ्याला मिळाली सोन्याची नाणी

शेतात सोन्याची नाणी मिळाल्याची माहितीही लोकांनी पोलिसांना दिली.
Gold Coin
Gold Coin Dainik Gomantak
Published on
Updated on

बक्सर जिल्ह्यातील गिरीधर बाराव गावात शेतात खोदकाम करताना सोन्याची नाणी सापडली आहेत. यानंतर सोन्याची नाणी मिळाल्याची बातमी गावभर पसरली. परिणामी शेकडो ग्रामस्थ त्या शेताकडे धावले. काही वेळातच तिथे लोकांचा मोठा जमाव झाला.

Gold Coin
गोवा, उत्तराखंडमधील निर्णयमागे काय होती भाजपची रणनिती

शेतात (Farm) सोन्याची नाणी मिळाल्याची माहितीही लोकांनी पोलिसांना (Police) दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी तीन नाणी जप्त केली आहेत. नाणी सापडलेल्या मैदानावर पोलिसांनी पहारा ठेवला आहे. शेतकरी कुटुंबातील वृद्ध महिलेच्या म्हणण्यानुसार, खोदकाम सुरू असताना आधी दोन नाणी आणि नंतर तीन नाणी सापडली. सर्व नाणी सोनेरी रंगाची होती आणि ती जुन्या वीस पैशांसारखी दिसत होती. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तीन नाणी सापडली असून, ती ऐतिहासिक आहेत.

बक्सर जिल्हा दंडाधिकारी म्हणाले की, तीन सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत, ज्याची सोनाराकडून तपासणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाच नाणी मिळाल्याची चर्चा आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून उर्वरित दोन नाण्यांचा शोध घेतला जात आहे. हे संपूर्ण प्रकरण लवकरच पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात येणार आहे.

Gold Coin
पश्चिम बंगालमध्ये कलम 355 लागू करावे; अधीर रंजन चौधरी यांची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतातून सोन्याची नाणी सापडली ते बिहारी साह आणि हरिहर साह यांचे शेत आहे. ज्यावर गावातील धनेश्वर महतो यांची पत्नी बिहसी देवी व मुलगा भीम महतो भाजीपाला पिकवत होते. रविवारी बिहासी देवी आपल्या मुलासह बांबूच्या काड्या लावण्यासाठी जमीन खोदत होत्या. यावेळी सोन्याची पाच नाणी सापडली. शेतातून सोन्याची नाणी सापडल्याचे पाहिल्यानंतर शेजारील शेतकर्‍यांनी (Farmer) संपूर्ण गावाला याची माहिती दिली आणि नंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. सापडलेली नाणी चेरो खरवारचे प्रसिद्ध राजे केशवा महाराज यांच्या काळातील असल्याचे म्हणले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com