PM मोदींचा अमेरिकेत जबरा फॅन, कारच्या नंबर प्लेटवर लिहिले 'NMODI' नाव, पाहा Video

अमेरिकेतील एका व्यक्तीने पंतप्रधान मोदींच्या 'फॅन'ने त्याच्या "NMODI" अशी कारची नंबर प्लेट लावली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi US Fan Video: बॉलिवूड आणि क्रिकेटचे चाहते जगभरात तुम्ही पाहिले असतीलच, पण अमेरिकेतील मेरीलँडमधील राघवेंद्र नावाचा हा व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जबरा फॅन आहे.

हा व्यक्ती पंतप्रधान मोदींचा इतका मोठा फॅन आहे की त्यांने आपल्या कारची नंबर प्लेट पीएम मोदींच्या नावावर नोंदवली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक राघवेंद्र यांच्या कारची नंबर प्लेट 'NMODI' नावाने रजिस्टर आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राघवेंद्र यांनी सांगितले की, त्यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये ही नंबर प्लेट परत घेतली होती.

  • 'नरेंद्र मोदी माझी प्रेरणा'

एएनआयशी बोलताना राघवेंद्र म्हणाले की, 'मी ही प्लेट नोव्हेंबर 2016 मध्ये परत घेतली होती. नरेंद्र मोदी (PM Modi) माझे प्रेरणास्थान आहेत. ते मला देशासाठी, समाजासाठी, जगासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा देतात. पंतप्रधान मोदी अमेरिकेत (America) येत आहेत, त्यामुळे मी त्यांच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहत आहे.

  • पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून दरम्यान अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. अमेरिकन सरकारही पंतप्रधान मोदींच्या या भेटीसाठी उत्सुक आहे. त्यांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी 23 जून रोजी वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रीगन बिल्डिंग आणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटर येथे देशभरातील निमंत्रित समुदाय नेत्यांना संबोधित करतील. यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन करणार आहेत.

  • व्हाईट हाऊसबाहेर भारताचा ध्वज फडकला

16 जून रोजी व्हाईट हाऊसच्या बाहेर भारतीय आणि अमेरिकेचे ध्वज एकत्र फडकवण्यात आले आहे. याची व्हिडिओ समोर आला आहे.  व्हाईट हाऊसबाहेर भारताचा ध्वज फडकल्याने भारतीय अमेरिकन लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.

न्यू जर्सी येथील अमेरिकन भारतीय नागरिक जेसल नार म्हणाले, 'तिरंगा पाहणे ही खरोखरच सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी माझ्या कामानिमित्त तिरंगा घेऊन अमेरिकेला जातो. पण, व्हाईट हाऊससमोर तिरंगा मुक्तपणे फडकताना पाहणे अभिमानास्पद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com