Facebook
FacebookDainik Gomantak

Facebook Ban: भारतात फेसबुकचं दुकान होणार बंद? हायकोर्टाच्या 'या' इशाऱ्याने वाढल्या अडचणी

Facebook Ban: कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या खंडपीठाने मेटाला इशारा दिला आहे.
Published on

Karnataka High Court On Facebook Ban: कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या खंडपीठाने मेटाला इशारा दिला आहे. फेसबुक या सोशल मीडिया कंपनीवर कर्नाटक पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे.

तपासात सहकार्य न केल्यामुळे न्यायालयाने फेसबुकवर बंदी घालण्याचे म्हटले आहे. हे प्रकरण सौदीमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाशी संबंधित आहे, ज्याचे नाव शैलेश कुमार आहे.

शैलेश कुमार 25 वर्षांपासून सौदी अरेबियात काम करत आहेत. शैलेश कुमार यांची पत्नी कविता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यातर्गंत ही सुनावणी सुरु आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कविता यांनी न्यायालयाला सांगितले की, 'शैलेश यांनी एकदा फेसबुकवर (Facebook) CAA आणि NRC च्या समर्थनार्थ एक पोस्ट टाकली होती, पण काही लोकांना ती आवडली नाही. शैलेश यांच्या नावाने बनावट खाते तयार आले, ज्यामध्ये सौदी किंग आणि इस्लामच्या विरुद्ध लिहिण्यात आले. यानंतर, सौदी पोलिसांनी शैलेश यांना अटक केली.'

कविता यांनी या प्रकरणाची तक्रार मंगळुरु पोलिसांकडे केली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासादरम्यान, मंगळुरु पोलिसांनी फेसबुककडून काही माहिती मागितली, पण कंपनीने प्रतिसाद दिला नाही. शैलेश कुमार प्रकरणाचा तपास 2021 पासून लांबणीवर पडत आहे.

Facebook
Karnataka High Court: नवऱ्यावर बलात्काराचा आरोप, कर्नाटक HC म्हणाले, 'कायद्याच्या दुरुपयोगाचे यापेक्षा चांगले उदाहरण...'

तपास कुठपर्यंत पोहोचला?

कविता यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, केंद्रालाही या प्रकरणाची माहिती दिली आहे. सोशल मीडिया कंपनीने पोलिसांना सहकार्य न केल्यास देशभरातील त्यांच्या सेवांवर बंदी घालण्याचा विचार करु, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) म्हटले आहे.

कविता या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बिकरनकट्टे येथील रहिवासी आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जून रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com