Exit Poll Of Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशात भाजप इतिहास रचू शकतो. असाच अंदाज एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. ZEE NEWS वरील BARC एक्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला 35-40 जागा, काँग्रेसला 20-25 जागा, AAP 0-3 जागा आणि इतरांना 1-5 जागा मिळू शकतात. एक्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेशात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये जनता राज्यातील भाजप सरकारवर शिक्कामोर्तब करताना दिसत आहे.
हिमाचलमध्ये पुन्हा भाजपचे सरकार
एक्झिट पोलमध्ये हिमाचल प्रदेशात भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. बीएआरसीच्या एक्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला 47 टक्के, काँग्रेसला 41 टक्के, आप 2 टक्के आणि इतरांना 10 टक्के मते मिळू शकतात. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत जनतेमध्ये कोणते मुद्दे प्रमुख होते ते जाणून घेऊया. एक्झिट पोलच्या सर्वेक्षणादरम्यान हिमाचलवासीयांनी काय उत्तर दिले?
1. हिमाचल सरकारने कसे काम केले?
- बरेच चांगले: 28%
काहीसे चांगले: 38%
- खूप वाईट: 30%
- काही सांगू शकत नाही: 4%
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.