जर आपण नोकरीच्या शोधात असाल किंवा बेरोजगार असाल तर आपल्याला कर्ज घेण्याची किंवा पैशांच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. आपण नोकरी आणि रोजगाराच्या संधी शोधात असताना आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक आधार मिळवू शकता. त्यासाठी जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे अर्थात (EPF) सदस्य असाल तर तुम्ही कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) दिलेल्या माहितीनुसार तुम्ही परत न करण्यासाठी काही ठराविक रक्कम घेऊ शकता. (EPF offer: Have you lost the job? Here's how to get the financial benefit)
ईपीएफओने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे, “ईपीएफ सदस्य आता बेरोजगारीच्या काळात नॉन-रिफंडेबल अॅडव्हान्सचा लाभ घेऊ शकता.” असे त्या ट्विटमध्ये लिहिण्यात आले आहे
काय आहे योजनेचे स्वरूप?
एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ नोकरीत नसलेले सदस्य त्यांच्या पीएफ खात्यावरील 75 टक्के रक्कम परत न करता या योजनेता लाभ घेवू शकातात.असे ईपीएफओने सांगितले.
ही सुविधा सदस्यांना बेरोजगारीदरम्यान आर्थिकदृष्ट्या मदत तर करेलचं, पण त्यासोबत त्यांचे ईपीएफ खाते बंद न झाल्यामुळे पेन्शन सदस्यता देखील सुरू राहणार आहे.
ईडीएलआय योजनेबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे...
या व्यतिरिक्त, ईडीएलआय योजना 1976 मधील सुधारणांनुसार ईडीएफआय सदस्याचे कुटुंबीय आणि आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या व्यक्ती देखील कोरोना महामारीच्या काळात या योजनेचा लाभ मिळवू शकतात.
ईपीएफ सदस्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना किंवा नामित व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळवून दिला जाईल अशी खात्री देण्यात आली आहे.
जर सदस्य 12 वर्षापासून सातत्यानं नोकरीत असेल तर मृत व्यक्तीच्या वारसांना किमान अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते.
ईडीएलआय योजनेत पीएफ सदस्यांसाठी ऑटो एनरॉल्मेंटची सुविधा आहे.
हि सगळी आर्थिक मदत थेट नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
कोणत्याही योगदानास कर्मचार्यांकडून पैसे देण्याची आवश्यकता नाही.
ईडीएलआय योजनेत पीएफ सदस्यांसाठी ऑटो नावनोंदणीची सुविधा आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.