
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १२ सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडनं दमदार विजय मिळवला. मँचेस्टरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला १४६ धावांनी पराभूत केले. हॅरी ब्रुकच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने प्रथम फलंदाजी करत ३०४ धावांचा विक्रमी स्कोअर केला, तर प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १५८ धावांवर सर्वबाद झाला.
इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या संघाने पहिल्या विकेटसाठी सलामीवीर फिल साल्ट आणि जोश बटलरच्या १२६ धावांच्या भागीदारीने मजबूत सुरुवात केली.
बटलरने ३० चेंडूत ८३ धावा करत १५ चौकार आणि ८ षटकारांसह सुमारे २७७ च्या स्ट्राईक रेटने धडाका केला. त्याचबरोबर, फिल साल्टने ६० चेंडूत १४१ धावा करून १५ चौकार आणि ८ षटकारांसह स्ट्राईक रेट २३५ ठेवला, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना मोठा धक्का बसला.
याशिवाय, जेकब बेथेलने १४ चेंडूत २६ धावा आणि कर्णधार हॅरी ब्रुकने २१ चेंडूत ४१ धावा करून इंग्लंडने २० षटकांत फक्त २ गडी गमावून ३०४ धावांचा विशाल स्कोअर तयार केला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पूर्ण सदस्य देशाविरुद्ध ३०० पेक्षा जास्त धावा करणारा इंग्लंडचा हा पहिला संघ ठरला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात अपेक्षितप्रमाणे चांगली होती, कर्णधार एडेन मार्करामने २० चेंडूत ४१ धावा करून संघाला मजबूत सुरुवात दिली. रायन रिकेल्टनने १० चेंडूत २०, डोनोव्हन फरेराने ११ चेंडूत २३ आणि जॉर्न फोर्टुइनने १६ चेंडूत ३२ धावा केल्या, परंतु या प्रयत्नांनंतरही दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला नाही. शेवटी पाहुणा संघ फक्त १६.१ षटकांत १५८ धावांवर सर्वबाद झाला.
या विजयासह इंग्लंडने पुन्हा एकदा दाखवून दिले की व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये ते जागतिक स्तरावरील सर्वोत्तम संघांपैकी एक आहेत. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाजूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पूर्ण वर्चस्व गाजवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.