Pulwama Militants Army Encounter: दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले; संपूर्ण परिसर सील, चकमक सुरु

Pulwama Militants Army Encounter: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागातील परिगाममध्ये शनिवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
Pulwama Militants Army Encounter
Pulwama Militants Army EncounterDainik Gomantak

Pulwama Militants Army Encounter: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागातील परिगाममध्ये शनिवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवादी कारवायांची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी तात्काळ परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरु केली.

यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी गोळीबार सुरु केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार होत असल्याच्या वृत्तादरम्यान, परिसरात 1-2 दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे, त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काश्मीर झोन पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे की, पोलीस आणि सुरक्षा दल ऑपरेशनमध्ये गुंतले आहेत.

तीन दिवसांतील ही तिसरी घटना आहे

दुसरीकडे, काश्मीर खोऱ्यात दिवाळीच्या धामधुमीत गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी गुरुवारी सकाळी शोपियानच्या काटोहलन भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका टीआरएफ दहशतवाद्याला ठार केले होते.

मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे (Terrorists) नाव मयस्सर अहमद दार असे असून तो शोपियानच्या वेश्रो भागातील रहिवासी असून तो एका आठवड्यापूर्वी TRF या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. घटनास्थळावरुन दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे.

Pulwama Militants Army Encounter
Pulwama Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षं पूर्ण; भारताने गमावले 40 जवान

कुलगाममध्ये 2 दहशतवादी मारले गेले

गेल्या महिन्यात 4 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सर्वसामान्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली होती. जिल्ह्यात दहशतवाद्यांची माहिती मिळताच शोध मोहीम सुरु करण्यात आली.

दरम्यान, तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले. दोन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com