Thiruvananthapuram Airport: केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. कालिकतहून दमामला जाणारे विमान हायड्रॉलिक बिघाडामुळे तिरुअनंतपुरम विमानतळाकडे वळवण्यात आले, त्यामुळे विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली.
हे विमान दुपारी 12.15 वाजता विमानतळावर उतरवण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX3 385 मध्ये 182 प्रवासी होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कालिकतहून टेकऑफ करताना विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला.
यानंतर वैमानिकांनी घाईघाईत विमानाचे इंधन अरबी समुद्रात टाकून विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. यानंतर पुर्ण विमानतळावर आणीबाणी लागू करण्यात आली होती.
या घटनेमुळे अडकलेल्या प्रवाशांना पर्यायी विमानाने दम्मामला पाठवले जाईल, असे विमान कंपनीने म्हटले आहे. हे विमान तिरुअनंतपुरम येथून दुपारी 3.30 वाजता उड्डाण करेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.