Starlink Internet Service: नेटवर्कचं टेन्शन संपणार! एलॉन मस्कची 'स्टारलिंक' सेवा भारतात दाखल होणार, मिळणार 'हाय-स्पीड इंटरनेट', वाचा फायदे

Starlink Internet Service In India: टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एॉलन मस्क यांची कंपनी आता भारतीय इंटरनेट क्षेत्रात प्रवेश करत आहे.
Elon Musk Starlink Internet Service
Elon Musk Dainik Gomantak
Published on
Updated on

Elon Musk Starlink Internet Service: टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांची कंपनी आता भारतीय इंटरनेट क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यांची कंपनी स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (Starlink Satellite Communications Pvt Ltd) भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणून कंपनीने मुंबईतील चांदिवली भागात सुमारे 1294 चौरस फूट जागेचे ऑफिस पाच वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे, ज्यासाठी 2.33 कोटी रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. यासह, भारतात मस्क यांच्या कंपनीची ही पहिली अधिकृत उपस्थिती मानली जात आहे.

मुंबईत 'डेमो रन' सुरु

स्टारलिंक कंपनीने आज, 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी मुंबईत आपल्या सेवेचा तांत्रिक आणि सुरक्षा 'डेमो रन' (Demo Run) आयोजित केला आहे. या डेमो रनमध्ये कंपनी आपल्या हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्कची क्षमता प्रदर्शित करेल. मस्क यांच्या कंपनीच्या या चाचणीला भारतात सॅटेलाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या एका नव्या युगाची सुरुवात मानले जात आहे. यामुळे देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागातही ब्रॉडबँड इंटरनेटची (Internet) पोहोच शक्य होईल, अशी अपेक्षा आहे. डेमो रननंतर कंपनी लवकरच भारतात व्यावसायिक लॉन्चिंग (Commercial Launch) करु शकते.

Elon Musk Starlink Internet Service
Elon Musk: ‘ॲपल’वरती मस्क चिडले! ‘ॲप’ची शिफारस न केल्याप्रकरणी दाखल करणार दावा; Xवर व्यक्त केली नाराजी

150 हून अधिक देशांत विस्तार

जरी स्टारलिंकला अजूनही काही सरकारी मंजुरी आणि स्पेक्ट्रम क्लिअरन्सची प्रतीक्षा असली तरी, तज्ज्ञांचे मत आहे की स्टारलिंकच्या आगमनामुळे भारतीय सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रात नवी स्पर्धा सुरु होईल. एलन मस्क यांची स्टारलिंक कंपनी 150 हून अधिक देशांमध्ये उपग्रहांच्या नेटवर्कद्वारे हाय-स्पीड आणि लो-लेटेंसी इंटरनेट सेवा प्रदान करते.

Elon Musk Starlink Internet Service
Elon Musk: 'जर वन बिग ब्युटीफुल बिल मंजूर झालं तर दुसऱ्याच दिवशीच...' एलन मस्क यांनी दिले नवीन पार्टी स्थापन करण्याचे संकेत

सेवांचे फायदे

  • ही सेवा ग्रामीण (Rural) आणि दुर्गम (Remote) भागांमध्ये प्रभावीपणे कार्य करू शकते.

  • ती समुद्री जहाजे (Ships) आणि विमानांमध्येही (Airplanes) इंटरनेट पुरवते.

  • पारंपरिक ब्रॉडबँड सेवा पोहोचू न शकणाऱ्या आपत्तीग्रस्त (Disaster Affected) क्षेत्रांमध्ये ही सेवा गेमचेंजर ठरु शकते.

Elon Musk Starlink Internet Service
Elon Musk Networth: मस्क 400 बिलियन डॉलर पार; आख्या जगात ठरले सर्वात श्रीमंत, इतिहासातील पहिलेच व्यक्ती

स्टारलिंकच्या जगभरात सध्या 70 लाखाहून अधिक ग्राहक (Customer) आहेत. कंपनीच्या प्रवेशानंतर भारतातील ग्रामीण भागासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरु शकते. तसेच, दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) जानेवारी-फेब्रुवारी 2016 पर्यंत भारतात सेवा दरांना (Prices) अंतिम रुप देईल. कंपनीला DoT आणि IN-SPACe कडून मंजुरी मिळाली असून गेटवे सेटअप देखील स्थापित झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com