आज पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून या पाचही राज्यांचं भविष्य काय हे उघड होणार आहे. हे भविष्य राज्यांबरोबर त्या त्या राज्यातील मुख्य नेत्यांचंही उघड होणार आहे. निवडणुकीच्या मतमोजणीचे पहिले कल हाती आले आहेत. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये जोरदार मुसंडी मारली असून सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुसरीकडे गोव्यामध्येही काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. या निवडणुकींच्या कलांमधील महत्त्वाची बाब म्हणजे सध्या तीन राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री पिछाडीवर आहेत. (Assembly Election results 2022 live updates)
गोवा-
गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळी मतदार संघातून 400 मतांनी आघाडीवर आहेत.
भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री पिछाडीवर तर गोव्यात काँग्रेस उमेदवारांची आघाडी दिसून येत आहे.
पंजाब-
पंजाबमध्येही हीच परिस्थिती दिसून येत आहे. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी देखील पिछाडीवर आहेत.
पंजाबचे या आधीचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे देखील पिछाडीवर आहेत.
उत्तर प्रदेश-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदारसंघातून 4 हजार 464 मतांनी जोरदार आघाडीवर आहेत.
समाजवादी पक्षाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे देखील आपल्या करहल मतदारसंघातून आघाडी करतांना दिसत आहेत
उत्तराखंड:
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी खतिमा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
मणिपूर:
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हेनगांग मतदारसंघातून 2,598 मतांनी आघाडीवर आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.