Monsoon Update: वरुणराजा यंदा रुसणार; पावसाचा टक्का घटणार, 'एल-निनो'चा प्रभाव; 5 टक्के कमी-अधिक तफावतीची शक्यता

El Nino impact on monsoon: नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामावर ‘एल-निनो’चे सावट असल्याने यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकेत आहेत.
El Nino impact on monsoon
El Nino impact on monsoonDainik Gomantak
Published on
Updated on

पुणे: नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामावर ‘एल-निनो’चे सावट असल्याने यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकेत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावतीची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. महाराष्ट्रातदेखील कमी पर्जन्यमानाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी आज मॉन्सून हंगामातील पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान, भारतीय महासागरातील द्वी-ध्रुवीता आणि उत्तर गोलार्धातील हिमाच्छादन हे घटक विचारात घेतले आहेत.

यंदाच्या मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (६६ टक्के), सरासरीइतक्या पावसाची शक्यता २७ टक्के आहे. तर सरीसरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अवघी सात टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे.

El Nino impact on monsoon
Goa Bank Fraud: बँक मॅनेजरच निघाला भामटा! 64.25 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल, ग्राहकांच्या नावे परस्पर काढले कर्ज

भारताचा अतिउत्तरेकडील भाग, पूर्वोत्तर राज्ये आणि दक्षिण द्वीपकल्पाचा काही भाग वगळता पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. मे अखेरीस हवामान विभागनिहाय सुधारीत अंदाज जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात १०५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात देशात सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २० टक्के अधिक पाऊस पडला होता.

El Nino impact on monsoon
Goa Premier League: धेंपो क्लबची नाट्यमय मुसंडी; अंतिम फेरीत धडक, पणजी जिमखान्याला नमविले

उष्माघाताबद्दल मार्गदर्शक सूचना

आगामी काळातील वाढत्या उष्म्याचा विचार करता उघड्यावर काम करणाऱ्या मजुरांचे उष्णतेपासून संरक्षण व्हावे यासाठी अनेक राज्‍यांत मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात आहेत. यानुसार, कामगारांचे कामाचे तास ठरविले जात आहेत. महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रकाशयोजना, वाहतूक आणि संरक्षणात्मक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत असेही यात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com