Eid Mubarak 2023: देशासह जगभरात आज 'रमजान ईद' साजरी केली जात आहे. हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण मानला जातो. ईद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो.
प्रत्येक मुस्लिम बांधव या खास दिवसाची वाट पाहत असतात. या दिवशी प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत असतात. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईद-उल-फित्र साजरी केली जाते.
रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासानंतर (रोजा) ईदचा सण सर्वांमध्ये उत्साह घेऊन आला आहे. सर्व मशीदांध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. लोक एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत आहेत. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर पहिल्यांदाच ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतांना दिसत आहे.
महाराष्ट्रात देखील महिम दर्गा येथे ईदनिमित्त नमाज पठण करण्यात आले.
मध्यप्रदेशमधील भोपाळ येतील ईदगाह येथे नमाज पठण करण्यात आले.
ईदनिमित्त हैदराबाद, तेलंगणातील चारमिनार जवळील मक्का मशिदीत लोकांनी नमाज पठाण केले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.