सामन्यांसाठी खुशखबर; खाद्यतेलांच्या किमतीत मोठी घट

इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) यांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्यतेलांच्या किमतींमध्ये 8 ते 10 रुपयांनी घट झाली आहे.
Edible oil prices decreases
Edible oil prices decreasesDainik Gomantak
Published on
Updated on

देश: कोरोना महामारी, महापूर, ओमिक्रॉन देशातील सामान्य जनता अगदी पिळवटून निघाली होती. त्यात वाढलेल्या महागाईमुळे तर सामन्यांच्या खिशाला कात्री लागत होती. पण आता सगळ्यांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या महिन्याभरात खाद्यतेलांच्या (Edible Oil) किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. (Edible oil prices decreases)

Edible oil prices decreases
मला भाजपची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, मी निवडणुक लढवणार; राजन कोरगावकर

खाद्यतेलांच्या आयात शुल्कामध्ये (Import Duties) घट झाल्यामुळे तेलांच्या किमती कमी झाल्या आहेत. मागील महिन्याभरात जवळजवळ या किमती 8 ते 10 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

Edible oil prices decreases
IISF: काय आहेत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची ठळक वैशिष्ट्ये ? जाणून घ्या

इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत स्तरावर तेलबियांचे उत्पादन वाढले असून जागतिक बाजारपेठेत मंदीचा कल आहे, त्यामुळे या किमती कमी झाल्या आहेत. शिवाय या किमती आणखी 3 ते 4 रु. प्रती लीटरने कमी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. एकंदरीत परिस्थितीमध्ये आणि महागाईच्या काळात तेलांच्या किमती कमी झाल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com