Nicobar Islands Earthquake: अंदमान आणि निकोबार बेटांवर जाणावले भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 5.0 तीव्रता

अंदमान निकोबार बेटांवर सोमवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले
Earthquake
EarthquakeDainik Gomantak
Published on
Updated on

Nicobar Islands Earthquake: अंदमान आणि निकोबार बेटांवर सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. निकोबार बेटांवरील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 इतकी मोजली गेली आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नुसार, सोमवारी सकाळी 5.07 वाजता निकोबार बेटांवर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.0 तीव्रता होती. भूकंपानंतर लोकांनी घाबरून घराबाहेर पळ काढला. भूकंपामुळे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याची अद्याप माहिती मिळाली नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 मोजली गेली. सकाळी 5.07 वाजता निकोबार बेटांवर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

  • रिश्टर स्केल म्हणजे काय?

1935 मध्ये, अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ चार्ल्स एफ. रिश्टर यांनी एका उपकरणाचा शोध लावला जो पृथ्वीच्या पृष्ठभागावर उठणाऱ्या भूकंपाच्या लहरींचा वेग मोजू शकतो. या यंत्राद्वारे भूकंपाच्या लहरींचे डेटामध्ये रूपांतर करता येते. रिश्टर स्केल सहसा लॉगरिथमनुसार कार्य करते. यानुसार, संपूर्ण संख्या त्याच्या मूळ अर्थाच्या 10 पटीने व्यक्त केली जाते. रिश्टर स्केलवर 10 हा कमाल वेग दर्शवतो.

  • जम्मू - काश्मीर मध्येही जाणवले भुकंपाचे धक्के

 या आधी शनिवारी उत्तराखंडच्या उत्तरकाशी आणि रविवारी जम्मू - काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात भूकंप झाला होता. रविवारी जम्मू - काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात ३.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बांदीपोरा जिल्ह्यात सकाळी ६.५७ च्या सुमारास ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली 34.42 अंश उत्तर अक्षांश आणि 74.88 अंश पूर्व रेखांशावर होता. येथेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com