
E-Sakal Comscore Ranking
पुणे: आजच्या आधुनिक युगात ताज्या घडामोडी तत्काळ मिळवण्याची वाचकांची अपेक्षा प्रचंड वाढली आहे. इंटरनेट आणि मोबाईलच्या वापरामुळे वाचक वर्ग बातम्यांच्या अधिक जवळ आलाय. या बदलत्या परिस्थितीत, 'ई-सकाळ' ही वेबसाईट मराठी वाचकांसाठी अत्यंत विश्वासू, अचूक आणि ताज्या बातम्यांचे एक उत्तम माध्यम म्हणून उदयास आली आहे.
सकाळ माध्यम समूहाला पत्रकारितेच्या क्षेत्रात ९३ वर्षांचा समृद्ध वारसा आणि अनुभव लाभला आहे. हा अनुभव त्यांनी डिजिटल माध्यमांच्या प्रवासातही यशस्वीपणे वापरला. २००० साली सुरू झालेल्या 'ई-सकाळ' या डिजिटल पोर्टलने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे.
ई-सकाळने नुकताच 16.5 मिलियन युजर्सचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, नवीन वर्षाच्या सुरुवातीला या पोर्टलने सर्वाधिक युजर्स मिळवले ज्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल पोर्टल म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. कॉमस्कोअर या डिजिटल क्षेत्रातील मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्मच्या अहवालानुसार, ई-सकाळने 16.5 दशलक्ष युजर्स मिळवून मराठी डिजिटल माध्यमांमध्ये सर्वाधिक आघाडी घेतली आहे.
कॉमस्कोअर हा विविध न्यूज पोर्टल्सचे युजर्स आणि पेजव्ह्यूज मोजणारा एक महत्त्वाचा आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे. जानेवारी महिन्यात ई-सकाळ प्लॅटफॉर्मने सर्वाधिक युजर्स आणि पेजव्ह्यूज मिळवून सकाळ समूहाने डिजिटल माध्यमांतील मक्तेदारी सिद्ध केली.
'ई-सकाळ' हे वेब पोर्टल २६ जानेवारी २००० रोजी सुरू झाले आणि तेव्हापासून ते २०२५ पर्यंत सातत्याने वाचकांपर्यंत उत्तम बातम्या पोहोचवतं. यामध्ये साम टीव्ही, गोमन्तक, सरकारनामा या इतर वेब पोर्टल्सचाही समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.