Viral Video: ई-रिक्षाला लावले ट्रॅक्टरचे टायर! देसी 'जुगाड'चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही आहे खरी टेक्नॉलॉजी'

Indian Jugaad Video: सध्या असाच एका भारतीयाच्या अजब कलाकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
Indian Jugaad Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Jugaad Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कलाकारांची आणि कल्पकतेची (Creativity) अजिबात कमतरता नाही आणि जेव्हा आपल्या भारत देशाचा विषय येतो, तेव्हा तर इथे 'जुगाड' (Ingenuity) करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांची ही कलाकारी आपल्याला रोज सोशल मीडियावर पाहायला मिळते. सध्या असाच एका भारतीयाच्या अजब कलाकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Indian Jugaad Video
"गोव्यात Gen Z कोणते कपडे घालतात?" इन्फ्लुएन्सर करिष्मानं सांगितला फॅशन फंडा; सोशल मीडियावर Video Viral

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपली ई-रिक्षा चालवताना दिसत आहे. पण ही रिक्षा तिच्या मूळ स्वरुपात नाही! या रिक्षात त्या व्यक्तीने असे मोठे बदल केले आहेत की, ते पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष लगेच वेधून घेत आहेत.

व्हिडिओमध्ये (Video) स्पष्टपणे दिसते की, या रिक्षाच्या मागील दोन्ही चाकांना बदलून त्यांना थेट ट्रॅक्टरचे मोठे टायर (Tractor Tires) बसवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर पुढे असलेले चाकही मोठे असून ते देखील ट्रॅक्टरच्या चाकासारखेच दिसते. अशा प्रकारे पूर्णपणे बदल करुन ही रिक्षा चालवली जात आहे. ही ई-रिक्षा आहे की, ट्रॅक्टरचा एखादा छोटा नमुना, हे लोकांना समजत नाहीये. या भन्नाट बदलामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Indian Jugaad Video
Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

'असा जुगाड फक्त भारतातच शक्य'

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ 'एक्स' वर @yadav_sunil01 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'असा जुगाड फक्त इंडियामध्येच शक्य आहे. हे जुगाड फक्त भारतवालेच विचार करु शकतात.'

ही बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला असून त्याला हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. भारतीयांच्या या नवनिर्मितीच्या (Innovation) वृत्तीवर नेटकरी भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

Indian Jugaad Video
'माकां कोकणी चालियो.." विवाह फेम अमृता राव बोलते अस्सल कोकणी, सोशल मीडियावर Video Viral; चाहते थक्क!

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्संनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

  • एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, "यालाच 'टेक्नॉलॉजी' (तंत्रज्ञान) म्हणतात!"

  • दुसऱ्या यूजरने या जुगाडाला "नवा आविष्कार केला.." असे म्हटले आहे.

  • तिसऱ्या यूजरला ही रिक्षा ओळखता आली नाही, त्याने विचारले, "हे ऑटो आहे की ट्रॅक्टर?"

  • एका अन्य यूजरने लिहिले आहे की, "हा जुगाड भारताबाहेर जाऊ नये!"

भारतीयांमध्ये असलेल्या सीमित संसाधनांचा वापर करुन मोठी समस्या सोडवण्याच्या या 'जुगाड' वृत्तीमुळेच असे व्हिडिओ जगभर पसतात आणि लोकांना आनंद देतात. या ई-रिक्षाच्या बदलामुळे सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठी चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com