Gyanvapi Vivad: ज्ञानव्यापीचे सर्वेक्षण सुरु ; लवकरच सत्य येणार समोर !

4 ऑगस्ट रोजी न्यायालयात अहवाल सादर करण्यात येणार
Gyanvapi Masjid
Gyanvapi MasjidDainik Gomantak
Published on
Updated on

Dyanvyapi Vivad : ज्ञानव्यापी मशीद कि मंदिर? असा प्रश्न भारतीयांना कित्येक वर्षांपासून पडला आहे. यामुळे याची सखोल चौकशी होऊन खर काय आहे ते बाहेर यायलाच हवं असे कित्येक भारतीयांचे म्हणने आहे. अशातच आज ज्ञानवापीचे एएसआय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हा संपूर्ण वाद संपवण्यात हे सर्वेक्षण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Gyanvapi Masjid
Pune-Mumbai Highway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 11 गाड्यांची एकमेकांना धडक Video

आजपासून एएसआय सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून 4 ऑगस्ट रोजी न्यायालयात अहवाल सादर करण्यात येणार आहे. मुस्लिम पक्षकार या सर्वेक्षणाबाबत प्रश्न उपस्थित करत असून हिंदू पक्षकार सत्य समोर आणण्याची भूमिका घेत आहेत.

एएसआयची 32 जणांची टीम सकाळी साडेसहाच्या सुमारास सर्वेक्षणासाठी ज्ञानवापीमध्ये पोहोचली आहे. हिंदू आणि मुस्लिम पक्षकार त्या ठिकाणी आहेत. त्यांना सर्वेक्षणात सामील होण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाराणसीचे पोलीस आयुक्त अशोक मुथा जैन हेही सोबत गेले आहेत. याशिवाय वाराणसीचे आयुक्त कौशल राज शर्मा हेही त्यावेळी उपस्थित होते.

Gyanvapi Masjid
The remote area of Taleigao exposes Governments Har Ghar Jal | Goa News | Gomantak TV

ज्ञानवापीच्या पश्चिमेकडील भिंतीचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे समाजत आहे. यामुळे जागेचे वय काय आहे ते समजेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com