चालकाने असं काही केलं, प्रवाशाला हाती घ्यावे लागले बसचे स्टेअरिंग

घडले असे काही आणि प्रवाशांने हाती घेतले बसचे स्टेअरिंग
bus staring
bus staringDainik Gomantak

उत्तर प्रदेशमध्ये अजब-गजब घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली रोडवेज बसला चालकाने रस्त्याच्या मध्येच सोडून पळून गेला. ही बस आग्राहून मथुरेला निघाली होती. या बसमध्ये सुमारे 42 प्रवासी होते. पण आग्रा-दिल्ली महामार्गावर बसचालकाने बस रस्त्यावर सोडून पळ काढल्याने प्रवाशंची चिंता वाढली होती. मिळालेल्या माहितीनुसार बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता.तो बस देखील नीट चालवत नव्हता. बसमधील प्रवाशांनी उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (UPSRTC) अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होउ शकला नाही.

प्रवाशाने बस स्टेअरिंग घेतले हातात

बसमधील एका प्रवाशाने बसचे स्टेअरिंग हातात घेण्याचा निर्णय घेतला. एका वृत्ताच्या अहवालानुसार 30 वर्षीय संकल्प कुमारने बस चालवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे मथुरेत पोहोचवले. संकल्प हा आग्रा येथील एका खासगी कंपनीत टेक्निशियन आहे. संकल्पने सांगितले की, त्याने यापूर्वी कधीही बस चालवली नव्हती. अशी माहिती मथुरा डेपोचे एआरएम एमएम शर्मा यांनी दिली.

  • बसचा ड्रायव्हर फुल्ल टू झाला, सगळ्यांचा जीव धोक्यात टाकला

बस सोडून पळून जाण्यापूर्वीच बस चालक बस नीट चालवत नव्हता, असे बसमधील प्रवाशी संकल्प यांनी सांगितले. पुढे तो म्हणाला, बस चालक हा बस नीट चालवत नव्हता. तो बस खुप वेगाने चालवत होता. बस दोन वेळा डिवाउडरवर धडकतांना वाचली. यामुळे सर्व प्रवाशांनी वाहन चालकाला बस थांबवण्यास सांगितले.

bus staring
माफिया डॉन मुख्तार अन्सारीची सून निखतच्या iphone मध्ये सापडले विदेशी नंबर; पोलिसांनी केली 8 तास चौकशी

बसमधील आणखी एक महिला प्रवाशी म्हणाली की बस चालकाने मद्य प्यायले होते. बस दुभाजकाला धडकणार असतानाच सर्वांनी चालकाला बस बाजूला थांबवण्यास सांगितले. चालकाला पाणी देण्यात आले. पण त्यानंतर तो बसही सुरू करण्याचा प्रयत्न करत होता.

काही वेळाने चालक बस सोडून पळून गेला. त्यानंतर त्यांनी इतर प्रवाशांना बस चालवण्यास सांगितले, असे संकल्पने सांगितले. यावर सर्वांचे एकमत झाले. मथुरा डेपोचे एआरएम एमएम शर्मा यांनी सांगितले की, चालकावर कडक कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com