India-Bangladesh Border: 'ऑपरेशन ईस्टर्न गेटवे' अंतर्गत DRI ने पकडले 14 कोटी किमतीचे 24.4 किलो सोने

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने 'ऑपरेशन ईस्टर्न गेटवे' अंतर्गत 14 कोटी रुपयांचे 24.4 किलो सोने जप्त केले.
Gold
GoldDainik Gomantak

Operation Eastern Gateway: पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने 'ऑपरेशन ईस्टर्न गेटवे' अंतर्गत 14 कोटी रुपयांचे 24.4 किलो सोने जप्त केले.

बांगलादेश, त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमधील सिंडिकेट बांगलादेशातून भारतात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. याप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आठ जणांना अटकही केली आहे.

आरोपींनी हे सोने वाहनांमध्ये लपवले

डीआरआयने जप्त केलेल्या सोन्याची बाजारात किंमत 14 कोटी रुपये आहे. या सोन्याचे एकूण प्रमाण 24.4 किलो आहे. डीआरआयने सांगितले की, आरोपींनी हे सोने (Gold) वाहनांमध्ये लपवले होते.

Gold
West Bengal: माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या हत्येचा पाकिस्तानने रचला कट

बांगलादेश, त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये तस्करी

अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही 'ऑपरेशन ईस्टर्न गेटवे' नावाची एक मोहीम राबवली आहे, ज्या माध्यमातून तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पहिल्यांदा माहिती गोळा केली होती. बांगलादेश, त्रिपुरा, आसाम (Assam) आणि पश्चिम बंगालस्थित सिंडिकेट मोठ्या प्रमाणात बांगलादेश सीमेवरुन सोने तस्करी करत होते.''

4 जणांकडून 95 सोन्याचे बार जप्त करण्यात आले

डीआरआयने सांगितले की, सिलीगुडीच्या पथकाने आसाममधील बदरपूर जंक्शन ते सियालदह या ट्रेनमधून पश्चिम बंगालमधील दलखोला रेल्वे स्टेशनवर प्रवास करताना चार जणांना पकडले. विशेष म्हणजे, त्यांच्याकडून 10.66 कोटी रुपये किमतीचे 18.66 किलो वजनाचे 95 सोन्याचे बार जप्त करण्यात आले.

Gold
West Bengal: वसतिगृहातील 10 विद्यार्थ्यांना विजेचा धक्का, 5 जणांची प्रकृती गंभीर

तसेच, अगरतळा येथे आणखी एका पथकाने भारत-बांगलादेश सीमेजवळ चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला अडवले. त्याच्याकडून 1.30 कोटी रुपये जप्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com