Dr. Abdul Kalam Inspiring Story: लहान वयात वर्तमानपत्रे विकली, शिक्षणासाठी बहिणीने सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या, वाचा 'मिसाईल मॅन' अब्दुल कलामांची प्रेरणादायी कहाणी

Dr. APJ Abdul Kalam Jayanti 2025: डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. ते एक भारतीय शास्त्रज्ञ, भारताचे 11 वे राष्ट्रपती आणि 'मिसाईल मॅन' म्हणून जगभर ओळखले जातात.
Dr. APJ Abdul Kalam Jayanti 2025
Dr. APJ Abdul KalamDainik Gomantak
Published on
Updated on

Dr. APJ Abdul Kalam Jayanti 2025: डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. ते एक भारतीय शास्त्रज्ञ, भारताचे 11 वे राष्ट्रपती आणि 'मिसाईल मॅन' म्हणून जगभर ओळखले जातात. 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडूमधील रामेश्वरम येथे त्यांचा जन्म झाला. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये त्यांनी मोलाची भूमिका निभावली. विशेषतः क्षेपणास्त्र (Missile) विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या या महान कार्यामुळेच त्यांना 'मिसाईल मॅन' ही ओळख मिळाली.

शिक्षण आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या या योगदानाच्या सन्मानार्थ 15 ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक विद्यार्थी दिन' (World Students' Day) म्हणूनही साजरा केला जातो. आज आपण या लेखाच्या माध्यमातून कलाम यांच्या आयुष्यातील दोन महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी प्रसंगांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली.

Dr. APJ Abdul Kalam Jayanti 2025
Dr. APJ Abdul Kalam Birth Anniversary : एका सामान्य मुलाचा राष्ट्रपती ते 'मिसाईल मॅन' बनण्याचा रंजक प्रवास

बालपणीचा आर्थिक संघर्ष आणि शिक्षणाचे महत्त्व

डॉ. कलाम यांचे बालपण अत्यंत साधे आणि गरिबीत गेले. त्यांचे कुटुंब तीव्र आर्थिक संकटातून जात होते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शालेय जीवनावर झाला. शाळेत असताना घरातील गरिबीमुळे त्यांना अनेकवेळा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीमुळे त्यांना अगदी लहान वयातच कामाला सुरुवात करावी लागली. ते कुटुंबाला मदत करण्यासाठी वर्तमानपत्रे विकण्याचे काम करत असत. या अनुभवांनी त्यांना सामान्य लोक आणि वंचितांच्या समस्यांची लहानपणीच जाणीव करुन दिली. तसेच, कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे त्यांना समजले.

या आर्थिक अडचणींनी त्यांना अधिक कठोर परिश्रम करण्याची आणि आपले शिक्षण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची प्रेरणा दिली. याच प्रेरणेच्या बळावर ते पुढे एक यशस्वी शास्त्रज्ञ आणि नंतर भारताचे राष्ट्रपती बनले. त्यांच्या या संघर्षातून त्यांनी जगाला हेच दाखवले की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाच्या जोरावर यश मिळवता येते.

Dr. APJ Abdul Kalam Jayanti 2025
Video: महात्मा गांधीपासून एपीजे अब्दुल कलामांपर्यंतच्या वीरांना भावी पिढीकडून अनोखी श्रद्धांजली

शिक्षणासाठी बहिणीने गहाण ठेवले सोने

डॉ. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील हा प्रसंग त्यांच्या शिक्षणाप्रती (Education) असलेल्या तळमळीचे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विशेषतः त्यांच्या बहिणीच्या निस्वार्थ समर्थनाचे प्रतीक आहे. कलाम यांना अभियांत्रिकी (Engineering) शिक्षण घेण्यासाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मध्ये प्रवेश घ्यायचा होता. प्रवेश तर मिळाला पण प्रवेशासाठी लागणारी 1000 ची फी भरणे त्यांच्या वडिलांना तात्काळ शक्य नव्हते.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने फी भरणे एक मोठे आव्हान होते. अशा कठीण प्रसंगी त्यांच्या बहिणीने म्हणजेच जोहराने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. पैशांची व्यवस्था करण्यासाठी तिने तिच्याकडील सोन्याच्या बांगड्या आणि चेन गहाण ठेवली आणि कलाम यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली फी भरली.

Dr. APJ Abdul Kalam Jayanti 2025
National Sports Day: भारतात दिले जाणाऱ्या 'या' ६ क्रीडा पुरस्कारांबद्दल माहिती आहे का?

हा प्रसंग कलाम यांच्यासाठी केवळ आर्थिक मदत नव्हता, तर त्यांच्या बहिणीचा त्यांच्या क्षमतेवर आणि शिक्षणावर असलेला अढळ विश्वास होता. बहिणीने दाखवलेल्या या पाठिंब्याने आणि केलेल्या त्यागाने कलाम यांना खूप प्रेरणा मिळाली. त्यांनी आपला अभ्यास अधिक जिद्दीने पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि पुढे त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या दोन प्रसंगातून डॉ. कलाम यांनी सिद्ध केले की, कठोर परिश्रम, जिद्द आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर कोणतीही आर्थिक अडचण यशाच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही. त्यांचे जीवन आजही कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com