Kedarnath Dham
Kedarnath Dham ANI

6 महिन्यांनी उघडले केदारनाथचे दरवाजे , रावल डोली घेऊन मंदिरात दाखल

केदारनाथचे दरवाजे उघडण्याच्या वेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी 10 हजार भाविकांसह उपस्थित होते.
Published on

6 महिन्यांनंतर बाबा केदारनाथचे दरवाजे आज उघडले आहेत. शुभ मुहूर्तानुसार सकाळी ६.२५ वाजता वैदिक मंत्रोच्चाराने मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले, त्यानंतर रावल (मुख्य पुजारी) बाबांची डोली घेऊन मंदिरात दाखल झाले. केदारनाथचे दरवाजे उघडण्याच्या वेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी 10 हजार भाविकांसह उपस्थित होते.

त्याचवेळी दरवाजे उघडण्यापूर्वी मंदिराचे प्रांगण 10 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. दरवाजे उघडल्यानंतर भाविकांना नियमानुसार पूजा करता येणार आहे. यापूर्वी गुरुवारीच केदारनाथमध्ये भाविकांची गर्दी झाली होती.

 Kedarnath Dham
Weather Update: देशात 10 दिवस आगोदर मान्सून होणार दाखल

यात्रेकरूंना गौरीकुंडहून केदारनाथला जाण्याची परवानगी मिळाली गौरीकुंडातील हजारो भाविक गुरुवारी सकाळी केदारनाथ धामकडे रवाना झाले. लोकांनी 21 किमी अंतर पायी, घोडा किंवा पिठूने कापले. सकाळी 6 वाजता सुरू झालेला प्रवास केदारनाथ धाम येथे सायंकाळी 4 वाजता संपला. क्षमतेपेक्षा जास्त भाविक आल्याने गर्दीचे वातावरण होते, त्यानंतर हजारो भाविक थांबले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी सर्वांना केदारनाथला जाण्याची परवानगी देण्यात आली.

असे मानले जाते की जगाच्या कल्याणासाठी बाबा केदारनाथ 6 महिने समाधीत राहतात. मंदिराचे दरवाजे बंद करण्याच्या शेवटच्या दिवशी नैवेद्य झाल्यानंतर दीड क्विंटल विभूती अर्पण केली जाते. दरवाजे उघडताच बाबा केदार समाधीतून जागे होतात. यानंतर ते भाविकांना दर्शन देतात.

 Kedarnath Dham
Viral Video|जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना स्फोट, दोन मजुरांचा वेदनादायक मृत्यू

बाबा केदारनाथचे मंदिर हे भारतीयांसाठी केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर ते उत्तर आणि दक्षिण भारताच्या धार्मिक संस्कृतीचा संगम आहे. उत्तर भारतात पूजेची पद्धत वेगळी आहे, परंतु बाबा केदारनाथमध्ये पूजा दक्षिणेतील वीर शैव लिंगायत पद्धतीने केली जाते. मंदिराचे सिंहासन रावलांच्या ताब्यात आहे, ज्यांना प्रमुख देखील म्हणतात. रावल यांचे शिष्य मंदिरात पूजा करतात. रावल म्हणजे पुजारी, जे कर्नाटकचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com