Doordarshan
Doordarshan Twitter

This Day That Year: 25 एप्रिल 1982 पासून 'दूरदर्शन' झाला रंगीत

'दूरदर्शन' प्रथमच 25 एप्रिल 1982 मध्ये कलरफूल झाला होता.
Published on

दूरदर्शन हा सर्वांच्या आठवणीतील असणार टीव्ही चॅनल आहे. याचे 25 एप्रिल 1982 मध्ये या पहिल्यांदाच ब्लॅक अँड व्हाइटमधून कलर टीव्हीमध्ये रूपांतर झाले होते. म्हणजेच 40 वर्षांपूर्वी या दिवशी देशात पहिल्यांदाच टीव्हीवर कलर प्रक्षेपण झाले होते. भारतात (India) होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतात प्रथमच कलर प्रसारणाचा निर्णय घेण्यात आला. (Doordarshan Latest News)

महाराष्ट्र माहिती केंद्राच्या अधिकृत खात्याने #TheDayInHistory या हॅशटॅगसह महत्त्वपूर्ण तारखेबद्दल ट्विट केले. नेटवर्क चॅनेलद्वारे कलर ब्रॉडकास्टची चाचणी 25 एप्रिल 1982 रोजी सुरू झाली.

दूरदर्शन रंगीत झाल्यानंतर लोकांनी लोकांनी रंगीबेरंगी पडद्यावर चित्रपट आणि गेम शो पाहणे सुरू केले. याला आता 40 वर्षे झाली आहेत.डी डी न्यूजने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर दूरदर्शनचा रंगीत व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. रंगीत प्रसारणामुळे टीव्हीच्या (TV) लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आता रिमोटच्या एका क्लिकवर शेकडो टीव्ही चॅनेल्स उपलब्ध आहेत. सुरुवातीला काही तास चालणाऱ्या टीव्ही चॅनेल्सचे प्रक्षेपण आता 24 तास सुरू झाले आहे. बातम्या, चित्रपट, खेळ, गाणी, भक्ती प्रत्येक क्षेत्राशी संबंधित वेगवेगळे चॅनेल आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com