अमरनाथनंतर जम्मूच्या डोडा जिल्ह्यात ढगफूटी, अनेक घरे-वाहने ढिगाऱ्याखाली

एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
Doda Today cloudburst was reported at Gunti Forest uphills of Thathri Town
Doda Today cloudburst was reported at Gunti Forest uphills of Thathri TownANI

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे उध्वस्त झाल्याचे दृश्य दिसत आहे. या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. अशातच डोडा जिल्ह्यात आणखी एक ढगफूटीची दुर्घटना घडली आहे. (Doda Cloudburst)

अमरनाथ गुहेत ढगफुटीमुळे झालेला विध्वंस अजूनही थांबलेला नाही, दरम्यान, जम्मूच्या दोडा जिल्ह्यातील थाथरीमध्ये ढगफुटीची घटना समोर आली आहे. यामध्ये कोणतेही नुकसान झाले नसले तरी ढगफुटीमुळे अनेक वाहने आणि घरे ढिगाऱ्याखाली दबल्याचे सांगण्यात येत आहे.

Doda Today cloudburst was reported at Gunti Forest uphills of Thathri Town
Amarnath Cloudburst: अमरनाथ ढगफूटी अपघातात 15 जणांचा मृत्यू, 60 बेपत्ता

आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास थाथरी टाउनच्या गुंटी फॉरेस्टच्या चढावर ढगफुटीची नोंद झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वाहने अडकून पडली होती आणि महामार्ग काही काळ ठप्प झाला होता, परंतु आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे अशी माहिती एसएसपी डोडा अब्दुल कयूम यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com