2 मे दिनविशेष : जाणून घ्या आज घडलेल्या महत्वाच्या घडामोडी!

2 मे हा दिवस कला आणि चित्रपटाशी संबंधित दोन मोठ्या घटनांसाठी इतिहासात नोंदला गेला आहे.
Dinvishesh
DinvisheshDainik Gomantak
Published on
Updated on

2 मे हा दिवस कला आणि चित्रपटाशी संबंधित दोन मोठ्या घटनांसाठी इतिहासात नोंदला गेला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक सत्यजित रे यांचा जन्म 2 मे रोजी झाला. महान चित्रकार लिओनार्दो दा विंची यांनी या दिवशी या जगाचा निरोप घेतला.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 2 मे या तारखेला नोंदलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे.

Dinvishesh
पणजीतील पावसाळापूर्व कामांना मुहूर्त मिळेना...

1519: महान चित्रकार लिओनार्डो-द-विंची यांचे निधन.

1921: पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न आणि ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानित चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक सत्यजित रे यांचा जन्म.

1924: नेदरलँड्सने सोव्हिएत युनियनला मान्यता देण्यास नकार दिला.

1933: हिटलरने जर्मनीतील कामगार संघटनांवर बंदी घातली.

1945: इटलीतील जर्मन सैन्याने आत्मसमर्पण केले.

1949: महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी खटला सुरू.

1950: फ्रान्सने कोलकात्याजवळील चंद्रनगरची वसाहत भारत सरकारच्या ताब्यात दिली.

1952: डी हॅव्हिलँड या जगातील पहिल्या जेट विमानाने लंडन आणि जोहान्सबर्ग दरम्यान पहिले उड्डाण केले.

1986: 30 वर्षीय एन. बॅनक्राफ ही उत्तर ध्रुवावर पोहोचणारी पहिली महिला ठरली.

1997: ब्रिटनच्या मजूर पक्षाचे नेते टोनी ब्लेअर यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.

2003: भारताने डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तोडलेले पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com