Indigo Airlinesने दिव्यांग मुलाला फ्लाइटमध्ये चढण्यास केली मनाई, DGCAने ठोठावला 5 लाखांचा दंड

खाजगी विमान कंपनी इंडिगो एअरलाइन्सने अपंग मुलाला विमानात बसण्यास नकार दिला.
Indigo Airline
Indigo AirlineANI
Published on
Updated on

खाजगी विमान कंपनी इंडिगो एअरलाइन्सने (Indigo Airlines) अपंग मुलाला विमानात बसण्यास नकार दिला. दरम्यान कंपनीच्या या कृत्याबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगो एअरलाईन्सला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या घटनेनंतर मुलाच्या पालकांनी फ्लाइटमध्ये चढण्यास नकार दिला.

हैदराबादला जाणाऱ्या विमानादरम्यान रांची विमानतळावर 7 मे रोजी ही घटना घडली. मूल घाबरले होते त्यामुळे त्याला फ्लाइटमध्ये चढण्यास नकार देण्यात आला,असे या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना इंडिगो एअरलाइन्सने सांगितले.

Indigo Airline
एका भारतीयाला हज यात्रेसाठी यंदा किती लाख खर्च येणार?

प्रकरणाची संवेदनशीलता आणि गुंतागुंत समजली नाही

दुसरीकडे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे म्हणणे आहे की इंडिगोच्या ग्राउंड स्टाफला अपंग मुलाला हाताळता आले नाही आणि मुलाला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखून परिस्थिती संवेदनशील आणि गुंतागुंतीची बनवली असल्याचे तपासात आढळून आले आहे.

Indigo Airline
बावर्ची हॉटेलला आग, अग्निशमन दल आणि क्रेनच्या मदतीने 10 जणांची सुटका

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वतः दखल घेतली. आणि आता हे प्रकरण मीडियामध्ये चर्चेत येऊ लागले, त्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून तथ्य शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. तपासात इंडिगोचे कर्मचारी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आणि नंतर कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com