सुसाईड नोट लिहून आईसह दोन मुलींची आत्महत्या, पोलीस म्हणतात...

आत्महत्येपुर्वी भिंतीवर चिठ्ठी चिकटवली
delhi vasant vihar three family members committed suicide after writing suicide note on the wall lcln
delhi vasant vihar three family members committed suicide after writing suicide note on the wall lclnDainik Gomantak

दिल्लीतील वसंत विहारमध्ये शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्राथमिक तपासात तिघांचाही मृत्यू गुदमरुन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी कुटुंबप्रमुखाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तेव्हापासून संपूर्ण कुटुंब नैराश्यात होते. मृताच्या कुटुंबीयांनी मृत्यूपूर्वी भिंतीवर चिठ्ठी चिकटवली होती की, खोलीत प्रवेश केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा लायटर किंवा आग लावू नका.(delhi vasant vihar three family members committed suicide after writing suicide note on the wall lcln)

खोलीतील गॅसमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये आणि इतर कोणाचेही नुकसान होऊ नये, हा त्यामागील उद्देश होता. म्हणजे कुटुंब स्वतः आत्महत्या करत होतेच, पण त्यांच्यामुळे इतर कोणाचेही नुकसान होऊ नये, याचीही काळजी वाटत असावी. तसेच खोलीतील गॅस सिलिंडरही उघडे असल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

delhi vasant vihar three family members committed suicide after writing suicide note on the wall lcln
मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या, कारण...

पोलीस घटनास्थळी पोहोचले असता फ्लॅटचे दरवाजे, खिडक्या चारही बाजूंनी बंद होत्या. स्थानिक लोकांच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा तोडला असता खोलीत धुराचे लोट पसरल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी तीन ठिकाणी आग पेटली होती आणि संपूर्ण कुटुंबाचे म्हणजेच आई आणि दोन्ही मुलींचे मृतदेह खोलीत पडले होते.

डीसीपी म्हणाले की, शनिवारी रात्री 8.55 वाजता पोलिसांना माहिती मिळाली की वसंत विहार येथील वसंत अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 207 आतून बंद आहे. आवाज देऊन किंवा दारावरची बेल वाजवूनही कोणीही आतून दरवाजा उघडत नाही. यानंतर एसएचओ वसंत विहार आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले.

मृत अंजू ही ज्येष्ठ नागरिक महिला तिच्या दोन मुली अंशिका आणि अंकूसोबत या फ्लॅटमध्ये राहत होती. दोन्ही मुलींचे वय 30 च्या आसपास होते. आजारपणामुळे वृद्ध अंजूला बेडवरून उठताही येत नव्हते. तसेच गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंजूच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. त्यामुळे हळूहळू आई आणि मुली डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या.त्यामुळे हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com