Vaishno Devi Good News: वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने दिली खूशखबर; तुम्हीही म्हणाल...

Delhi-Amritsar-Katra Expressway: तुम्ही वैष्णोदेवीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Vaishno Devi
Vaishno DeviDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Delhi-Amritsar-Katra Expressway: तुम्ही वैष्णोदेवीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने अनेक गाड्या सुरु केल्या आहेत.

यातच आता, रस्ते मार्गाने कटरा येथे जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली ते कटरा हा प्रवास अवघ्या सहा तासावर येणार आहे. सध्या या प्रवासासाठी 10 ते 12 तास लागतात.

एक्स्प्रेस वे डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल

दिल्ली-अमृतसर-कटरा ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून तयार केला जात आहे. या एक्स्प्रेस वेचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.

यानंतर तुम्ही अतिरिक्त वेळ न घेता रस्ते आणि रेल्वेने वैष्णोदेवीला पोहोचू शकाल. 670 किमी लांबीचा दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे 37,524 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे.

Vaishno Devi
Vaishno Devi: वैष्णोदेवीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर, रेल्वेने सुरु केली नवी सुविधा; आता फक्त...

नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या एक्स्प्रेस वेबाबत घोषणा केली होती. नव्या एक्स्प्रेस वेच्या निर्मितीमुळे दिल्ली ते कटरा हे अंतरही कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांत गडकरींनी जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या सर्व प्रकल्पांची पाहणी केली होती. सध्या तुम्ही दिल्लीहून वैष्णोदेवीला रस्त्याने गेलात तर तुम्हाला किमान 12 तास लागतात.

चार तासांत अमृतसरला पोहोचाल

याशिवाय, दिल्ली ते अमृतसर या 405 किमीच्या प्रवासाला आठ तास लागतात. मात्र एक्स्प्रेस वे तयार झाल्यानंतर अमृतसरपर्यंतचे अंतर चार तासांत कापले जाणार आहे.

त्याचवेळी, दिल्लीहून (Delhi) कटरा सहा तासांत पोहोचेल. या एक्स्प्रेस वेवरुन आठ तासांत श्रीनगरला पोहोचता येते. दिल्ली-कटरा द्रुतगती मार्गावर फूड कोर्ट, ट्रॉमा सेंटर, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिस स्टेशनची सुविधा असेल.

Vaishno Devi
Vaishno Devi यात्रा आता काही मिनिटांत होणार पूर्ण, सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

तसेच, डिसेंबरपासून हा एक्स्प्रेस वे हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून जाईल. ते सुरु झाल्यानंतर दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधून येणाऱ्या लोकांची सोय होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa 97 Voters Electoral Roll
Sakal New App
Mayanalla Devi History
Goa Political Meetings During Ganesh Chaturthi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com