दिल्लीत आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, राजधानी हाय अलर्टवर

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष कक्षाने पाकिस्तानी नागरिकत्वाच्या एका दहशतवाद्याला लक्ष्मी नगरमधील (Laxami Nagar) रमेश पार्कमधून (Ramesh Park) अटक केली आहे.
Delhi Police special cell arrest Pakistan terrorist in Laxami Nagar,  Ramesh Park
Delhi Police special cell arrest Pakistan terrorist in Laxami Nagar, Ramesh ParkDainik Gomantak
Published on
Updated on

देशाच्या राजधानी दिल्लीतून (Delhi) एका पाकिस्तानी दहशतवाद्याला (Pakistani Terrorist) अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष कक्षाने पाकिस्तानी नागरिकत्वाच्या एका दहशतवाद्याला लक्ष्मी नगरमधील (Laxami Nagar) रमेश पार्कमधून (Ramesh Park) अटक केली आहे. हा दहशतवादी भारतीय नागरिकाच्या बनावट ओळखपत्रासह राहत असल्याचे समोर आले आहे सध्या या परिसरात पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.(Delhi Police special cell arrest Pakistan terrorist in Laxami Nagar, Ramesh Park)

Delhi Police special cell arrest Pakistan terrorist in Laxami Nagar,  Ramesh Park
शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा,लष्कराने घेतला बदला

एके -47 रायफलसह पाकिस्तानच्या या दहशतवाद्याकडून गोळ्यांच्या 60 फेऱ्या, एक हँडग्रेनाईड , 2 अत्याधुनिक पिस्तुल जप्त करण्यात आल्याचे कळले आहे. रात्री 9.30 वाजता दहशतवाद्याला अटक केल्याचे बोलले जात आहे. हा दहशतवादी पाकिस्तानच्या नारोवाल येथील रहिवासी आहे.असे समजत आहे. हे पाकिस्तानी दहशतवादी लक्ष्मीनगर परिसरात खूप वेळापासून 6 भारतीय पासपोर्टसह राहत असल्याची माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्याच्या अटकेनंतर पोलीस आता त्याच्या नेटवर्क आणि साथीदारांविषयी माहिती गोळा करत आहेत.

भारतीय गुप्तचर संस्थांना ही माहिती मिळाली होती की पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय देशातील सणांच्या निमित्ताने मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. हे पाहता राजधानी दिल्लीची सुरक्षा आता वाढवण्यात आली. दिल्ली पोलीस हॉटेल आणि गेस्ट हाऊसवर नजर ठेवून आहेत. भाडेकरूंच्या पडताळणीवरही भर दिला जात आहे.

दरम्यान यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानातील दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि या सणासुदीच्या काळात देशात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणाऱ्या सात संशयित दहशतवाद्यांना अटक देखील केलीहोती .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com