Jahangirpuri Violence: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई, मुख्य आरोपी गजाआड

दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार (Jahangirpuri Violence) प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका महत्त्वपूर्ण आरोपीला अटक केली आहे.
Farid alias Neetu
Farid alias NeetuDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका महत्त्वपूर्ण आरोपीला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसाचाराचा आरोपी फरीद उर्फ नीतूला अटक केली आहे. फरीदला जहांगीरपुरी (Jahangirpuri) हिंसाचारातील मुख्य गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते. स्पेशल सेलने त्याला कोलकाता (Kolkata) येथून अटक केली. स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जहांगीरपुरीमध्ये दगडफेक झाली तेव्हा या आरोपीने जमावाला भडकावले आणि अफवा पसरवली होती. त्यानेच या हिंसाचारप्रकरणी मुख्य भूमिका बजावली, त्यानंतर तो कोलकातामध्ये पळून गेला होता. (Delhi Police have arrested Farid alias Neetu, accused in Jahangirpuri violence)

Farid alias Neetu
Jahangirpuri Violence: ऑपरेशन बुलडोजरला ब्रेक; सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, ''तो जातीय दंगलींमध्ये अतिशय सक्रियपणे सहभागी होता. त्याने या हिंसाचारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला अटक करण्यासाठी आमची अनेक टीम पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र अखेर त्याला गुरुवारी तामलुक गावात त्याच्या नातेवाईकाच्या घरातून अटक करण्यात आली. त्याला आज विमानाने दिल्लीत आणले जात आहे.''

तसेच, दंगलीनंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला होता. तेव्हापासून तो सतत ठावठिकाणा बदलत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. आरोपी फरीद पश्चिम बंगालमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असल्याचे त्याने सांगितले. त्याचवेळी त्याने सांगितले की, '2010 पासून आतापर्यंत माझ्यावर दरोडा, चोरी आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये सहा गुन्हे दाखल आहेत.' त्याचबरोबर तो जहांगीरपुरी परिसराचा हिस्ट्रीशीटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com