वॉन्टेड नक्षलवादी नेत्याला 26 वर्षांनंतर अटक

किशून पंडितसह 4 आरोपी फरार झाले होते
delhi police arrested wanted naxalite leader kishun pandit faridabad
delhi police arrested wanted naxalite leader kishun pandit faridabad Dainik Gomantak
Published on
Updated on

26 वर्षांपूर्वी मृत झालेल्या इंडियन पीपल्स फ्रंट मालेच्या नक्षलवादी नेत्याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. तो दिल्लीजवळ फरीदाबादमध्ये लपून बसला होता. त्याचे नाव किशून पंडित असे आहे. किशून पंडित नक्षलवादी नेत्यावर बिहारमध्ये पोलिसांची हत्या केल्याचा आणि अनेक जघन्य गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. पोलिसांना चकमा देण्यासाठी त्याने स्वतःला मृत घोषित केले आणि नंतर फरिदाबादमध्ये राहू लागला.

आरोपी नक्षलवादी नेता किशून पंडित याने चौकशीदरम्यान पोलिसांसमोर खुलासा केला की, 1996 मध्ये बिहारच्या पुनपुन भागात नक्षलवादी देविंदर सिंगची अज्ञात लोकांनी हत्या केली होती, तेव्हा पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह सोबत नेला होता. किशून पंडित यांनी साथीदारांसह पोलीस दलावर हल्ला करून मृतदेह आणला. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर तीन जवान जखमी झाले होते.

delhi police arrested wanted naxalite leader kishun pandit faridabad
एकाच कुटुंबातील 11 जणांची राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे इच्छा मरणाची मागणी

वाटेत हल्लेखोरांनी पोलिसांची (police) रायफल आणि 40 जिवंत काडतुसे लुटून नेली. या घटनेनंतर बिहार पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी 31 आरोपींना अटक केली होती, मात्र नक्षलवादी नेता किशून पंडितसह 4 आरोपी फरार झाले होते.

आरोपी किशून पंडित याने पोलिसांपासून पळून जाण्याचा कट रचला. त्याने आपल्या कुटुंबासह स्वतःच्या मृत्यूचा कट रचला. बिहारमधील (Bihar) रेल्वे अपघातादरम्यान (Accident) त्यांनी स्वत:ला मृत घोषित केले. किशून पंडित यांचा मृतदेह व अंत्यसंस्कारही करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com