''लग्नासाठी धर्म बदलायचा असेल तर आधी...'', हायकोर्टाकडून गाइडलाइन जारी

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने एक गाइडलाइन जारी केली आहे. लग्नासाठी धर्म बदलणाऱ्यांनी त्याचे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
Marriage
MarriageDainik Gomantak

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने एक गाइडलाइन जारी केली आहे. लग्नासाठी धर्म बदलणाऱ्यांनी त्याचे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. आता धर्म बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार असल्याचे समोर आले आहे. केवळ लग्नाच्या उद्देशाने किंवा कायद्यापासून वाचण्यासाठी केल्या जाणाऱ्या धर्मांतरांवर दिल्ली उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. धर्मांतर करणाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाने हे बंधनकारक केले आहे. यासोबतच, न्यायालयाने म्हटले की, ''लग्नाच्या उद्देशाने, धर्म बदलून लग्न करणाऱ्या जोडप्याला त्यांच्या निर्णयाचे परिणाम काय आहेत, हे प्रतिज्ञापत्रावर जाहीर करावे लागेल.''

न्यायालयाने म्हटले की, धर्मांतराचे प्रमाणपत्र हे धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीच्या स्थानिक भाषेत असले पाहिजे, जेणेकरुन त्या व्यक्तीला ते समजले पाहिजे. उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, या संदर्भात लोकांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. विशेष विवाह कायद्यांतर्गत केलेल्या विवाहाच्या प्रकरणांव्यतिरिक्त, आंतरधर्मीय विवाहाच्या वेळी दोन्ही पक्षांचे वय, वैवाहिक इतिहास, धर्मांतरानंतरची वैवाहिक स्थिती आणि त्याचे पुरावे संबंधित अधिकाऱ्यांनी मिळवावेत, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयाने दिले आहे. हे धर्मांतर स्वेच्छेने होत असल्याचे प्रतिज्ञापत्र प्राप्त करुन द्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. धर्मांतर आणि विवाहाचे प्रमाणपत्रही स्थानिक भाषेत असावे.

Marriage
Delhi High Court: बलात्काराच्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी विवाहाची ढाल; संतापजनक प्रकार वाढत असल्याने कोर्टाने फटकारले

जिथे धर्मांतरित व्यक्तीची बोली आणि समजली जाणारी भाषा हिंदी व्यतिरिक्त इतर असेल तिथे ती भाषा वापरली जाऊ शकते. धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मूळ धर्मात परत जाण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार नाहीत, कारण धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मूळ धर्माची आधीच चांगली ओळख असते. उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, ते कोणताही कायदा बनवत नाहीत किंवा धर्मांतरासाठी कोणतीही पद्धत निर्धारित करत नाही, परंतु संसदेने लागू केलेल्या कायद्यात त्रुटी किंवा अंतर असेल तेव्हा न्यायालयांना पाऊल उचलावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com