दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिला राजीनामा

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला आहे.
Delhi Deputy Governor Anil Baijal
Delhi Deputy Governor Anil Baijal Dainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणे नमूद केली आहेत. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवला आहे. अनिल बैजल (Delhi Deputy Governor Anil Baijal) हे पाच वर्षांहून अधिक काळ लेफ्टनंट गव्हर्नर पदावर होते. माजी IAS अधिकारी बैजल यांची 31 डिसेंबर 2016 रोजी दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नजीब जंग यांची जागा घेतली होती.

विशेष म्हणजे, 1969 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले बैजल हे अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) सरकारमध्ये केंद्रीय गृहसचिव पदावर होते. इतर मंत्रालयातही त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 70 वर्षीय बैजल, 1969 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अनिल बैजल यांनी दिल्ली (Delhi) विकास प्राधिकरणाच्या उपसचिव पदावरही काम केले आहे. त्यांनी एअर इंडियाचे सीएमडी आणि प्रसार भारतीचे सीईओ पदही भूषवले आहे. 2006 मध्ये, बैजल शहरी विकास मंत्रालयाच्या सचिव पदावरुन निवृत्त झाले. अनिल बैजल यांच्या राजीनाम्यावर दिल्लीतील आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com