पंतप्रधान मोदी आज डेहराडूनमध्ये 18 हजार कोटींच्या योजनांची करणार पायाभरणी

पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारचे काम आणि धामी यांच्या युवा नेतृत्वामुळे भाजपचे सरकार स्थापन होऊन उत्तराखंडचे स्वप्न पूर्ण होणार; मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

Uttarakhand Election
Uttarakhand ElectionDainik Gomanatak
Published on
Updated on

Uttarakhand Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi)उत्तराखंडमध्ये 2022 च्या विधानसभा निवडणुक (Election) प्रचाराची सुरुवात शनिवारी जाहीर सभेतून करणार आहेत. हवामानातचा अंदाज घेत पक्षाने सभेच्या ठिकाणी परेड ग्राऊंडवर तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Chief Minister Pushkar Singh Dhami) म्हणाले की, पंतप्रधानांचे म्हणणे ऐकण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दूरदूरचे लोक आपापल्या मार्गाने डेहराडूनला (Dehradun) पोहोचत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 18 हजार कोटींच्या योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन आज करणार आहेत.


Uttarakhand Election
‘‘ओमिक्रॉन’विरुद्ध लढण्यास गोवा सज्ज’

त्यांच्या आगमनाने आपल्या सर्वांमध्ये नवी ऊर्जा संचारेल, असही मत त्यांनी यावेळी मांडले. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंड भाजपचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट डेहराडूनला पोहोचले आहेत. सहनिवडणूक प्रभारी आरपी सिंग, लॉकेट चॅटर्जी आणि इतर नेत्यांनीही डेहराडूनमध्ये तळ ठोकला आहे. मुख्यमंत्र्यांसह निवडणूक प्रभारींनी परेड ग्राऊंडवर रॅलीच्या तयारीचा आढावा घेतला.


Uttarakhand Election
'मांद्रे मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेत्यांचा मान राखावा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील त्यांच्या उपस्थितीत संबोधित करणार आहेत. कौशिक यांना यावेळी सभेला संबोधित करण्यासाठी तीन मिनिटे आणि धामी यांना 10 मिनिटे देण्यात आली आहेत.

पंतप्रधानांच्या जाहीर सभेसोबतच भाजपच्या निवडणूक प्रचाराची घोषणा होणार आहे. हा गेम चेंजर असेल. लोकांमध्ये मोठा उत्साह आहे. पाच वर्षांत सरकारने ऐतिहासिक कामे केली आहेत. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारचे काम आणि धामी यांच्या युवा नेतृत्वामुळे भाजपचे सरकार स्थापन होऊन उत्तराखंडचे स्वप्न पूर्ण होणार आहे अस मत यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com