CDS Bipin Rawat Death: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज संसदेत देणार निवेदन

तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचं निधन झालं आहे
Defense Minister Rajnath Singh will brief to both houses of parliament on CDS Bipin Rawat Death
Defense Minister Rajnath Singh will brief to both houses of parliament on CDS Bipin Rawat DeathDainik Gomantak
Published on
Updated on

तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) कोसळलेल्या हेलिकॉप्टरबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन देणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री सकाळी 11.15 वाजता लोकसभेत आणि दुपारी राज्यसभेत हेलिकॉप्टर अपघाताबद्दल माहिती देतील . लष्कराच्या प्रोटोकॉलचे पालन करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत माहिती दिली आहे .(Defense Minister Rajnath Singh will brief to both houses of parliament on CDS Bipin Rawat Death)

तत्पूर्वी संरक्षण मंत्री काल सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांच्या घरी गेले होते. तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 जण ठार झाले. यामध्ये हवाई दलाच्या Mi-17 हेलिकॉप्टरचा पायलट आणि सीडीएसचे वरिष्ठ कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर तामिळनाडूतील वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

भारतीय हवाई दलाने या अपघाताला दुजोरा दिला आहे. आयएएफने ट्विट केले की, 'सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह आयएएफ Mi-17V -5 हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ क्रॅश झाले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.'

राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी तामिळनाडूतील कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. माजी केंद्रीय मंत्र्यांनी ही घटना धक्कादायक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा इशारा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'अंतिम अहवाल आलेला नाही, त्यामुळे मला काहीही सांगणे फार कठीण आहे.'

Defense Minister Rajnath Singh will brief to both houses of parliament on CDS Bipin Rawat Death
CDS Bipin Rawat Death: सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

दरम्यान, खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नी होते. तर इतर 3 सहकारी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात आले होते. या सर्वांना उपचारासाठी वेलिंग्टन तळावर नेण्यात आले होते. चौथ्या व्यक्तीचाही शोध सुरु असल्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपिन रावत आपल्या पत्नीसोबत उटी येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र हा अपघात कुन्नूरच्या घनदाट जंगलात घडला. लष्कराने अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नव्हते. हे हेलिकॉप्टर एमआय सीरीजचे होते. सीडीएस बिपिन रावत, त्यांचे कर्मचारी आणि काही कुटुंबीय या विमानामध्ये होते. स्थानिक लोकही बचावकार्यात मदत करत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com