देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून आमच्या सीमेवर आव्हाने असूनही देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही याची देशातील लोकांना पूर्ण खात्री आहे असे म्हणत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे. तामिळनाडूतील डीएससी कॉलेजच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही.(Defense Minister Rajnath Singh warns China & Pakistan on national security)
या दरम्यान त्यांनी चीन-पाकिस्तानकडून (China) ईशान्येकडे असलेल्या देशांना ही चोख प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवाद संपल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाकिस्तानवर निशाणा साधत संरक्षण मंत्री म्हणाले की, शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) दोन युद्धे गमावूनही प्रॉक्सी वॉरचा अवलंब करत आहे आणि दहशतवाद (Terrorism) हा त्याच्या राज्य धोरणाचा अविभाज्य भाग बनला आहे.त्याने दहशतवाद्यांना (Terrorists) शस्त्रे, निधी आणि प्रशिक्षण देऊन भारताला लक्ष्य करणे सुरू केले आहे. राजनाथ सिंह म्हणाले, "जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदी आज यशस्वी झाली, तर ती आपल्या ताकदीमुळे आहे." राजनाथ म्हणाले की, 2019 मध्ये बालाकोट हवाई हल्ल्यामुळे आम्ही बळकट झालो आहोत.
पाकिस्तानशिवाय राजनाथ सिंह यांनीही चीनला चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'भारत-चीन सीमारेषेदरम्यान, जेव्हा चिनी सैन्य पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, त्या दरम्यान मी रात्री 11 च्या सुमारास लष्करप्रमुखांशी बोललो. त्या गंभीर परिस्थितीतही आपल्या सैन्याचे विवेकी वर्तन कौतुकास्पद आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तामिळनाडूतील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजला (डीएसएससी, वेलिंग्टन) संबोधित करताना सांगितले की, "भारत केवळ त्याच्या भूमीवरचा दहशतवाद नाहीसा करेल असा विश्वास आहे, पण गरज पडल्यावर आपल्या भूमीवर दहशतवादविरोधी कारवाया करण्यासही भारत मागेपुढे पाहणार नाही असा इआशाराही त्यांनी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.