Odisha Train Accident क्रेन आणि बुलडोझरची घरघर, रेल्वे रूळावर पडलेला रक्ताचा सडा अन् सर्वत्र विखुरलेले मानवी अवयव, रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज अन् पोलिस तसेच डॉक्टरांची धावपळ, प्रत्येकजण कुणाच्या तरी मदतीसाठी धावतो आहे. बालासोरमधील जिल्हा रुग्णालयाला तर लष्करी छावणीचेच रूप आले होते.
ओडिशामध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघाताचे भयावह चित्र शनिवारी पाहायला मिळालं अन् अवघा देश शोकसागरात बुडाला. या अपघातामध्ये मरण पावलेल्यांची संख्या 290 वर पोचली असून 900 पेक्षाही अधिकजण जखमी झाले आहेत.
ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहनागा बाजार येथे झालेल्या या भीषण तिहेरी रेल्वे अपघातामध्ये बंगळूर- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालिमार- चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि एका मालवाहू गाडीचे मोठे नुकसान झाले.
या अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये आढावा घेतला, त्यानंतर ते घटनास्थळी पाहणी करण्यासाठी रवाना झाले.
दोषींवर कारवाई:-
पंतप्रधान मोदी यांनी आज घटनास्थळाला भेट देत पाहणी केली, या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांसोबत यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान देखील उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.