भारत बायोटेकला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने नुकतीच इंट्रानासल बूस्टर डोस Intranasal Booster Dose चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. 9 वेगवेगळ्या ठिकाणी या चाचण्या घेण्यात येणार आहेत. अहवालात सांगितल्या प्रमाणे, चाचणीमध्ये फक्त 900 लोक सहभागी होतील.
डीसीजीआयने दोन्ही लसी बाजारात आणण्यास गुरुवारीच मान्यता दिली होती. मात्र बाजारात विक्रीसाठी डीसीजीआयची अटही घालण्यात आली आहे. लस मिळविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे देखील बंधनकारक असेल जाहीर केले आहे.
मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसणार लस
डीजीसीआयच्या सांगितल्यानुसार मेडिकल स्टोअरमध्ये ही लस उपलब्ध होणार नाही. ही लस रुग्णालये आणि दवाखान्यामधून खरेदी केली जाऊ शकते. तसेच या लसीकरणाचा डेटा दर सहा महिन्यांनी DCGIकडे सादर करावा लागेल. तसेच हा डेटा COWIN (Cowin)अॅपवरही अपडेट केला जाईल.
मोफत लसीकरणाची शासकीय मोहीम सुरूच राहणार
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, मोफत लसीकरणाची शासकीय मोहीम ही सुरूच राहणार आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने आता Covaxin आणि Covishield ला काही अटींसह आपत्कालीन परिस्थितीत (प्रतिबंधित) प्रौढ लोकसंख्येच्या लोकांना वापरण्याची परवानगी दिली आहे.
95 टक्के लोकांना पहिला डोस
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत देशातील 95% लोकांना पहिला डोस तर 74% लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. 97.03 लाख लोकसंख्येला बूस्टर डोस (Booster Dose) देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने पुढे माहिती दिली की, 27 जानेवारीपर्यंत भारतात कोरोनाचे 22,02,472 सक्रिय रुग्ण आहेत तर केसेस पॉझिटिव्ह दर 17.75% आहे. पॉझिटिव्ह रूग्ण हे 11 राज्यांमध्ये 50,000 हून अधिक आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये ३ लाखांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.