Viral Video: 5,100 पाठवत मुलगी म्हणाली, 'व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवा'; लेकरांची वाट बघत बाप गेला निघून, अखेर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी दिला अग्नी

Daughters Skip Father Funeral Video Call: समाजमनाला चटका लावून जाणारी आणि बदलत्या कौटुंबिक नात्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी अत्यंत भावुक घटना हरियाणातील सोनीपत येथून समोर आली.
Staff at an old age home performing the last rites of an elderly man
Daughters Skip Father FuneralDainik Gomantak
Published on
Updated on

Daughters Skip Father Funeral Video Call: मुलगा असो वा मुलगी, प्रत्येक माता-पिता आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावतात. मात्र, जेव्हा याच पालकांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मुलांच्या आधाराची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा अनेकदा त्यांच्या नशिबी फक्त एकाकीपण येते. अशीच एक समाजमनाला चटका लावून जाणारी आणि बदलत्या कौटुंबिक नात्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी अत्यंत भावुक घटना हरियाणातील सोनीपत येथून समोर आली. ज्या वडिलांनी आपल्या तिन्ही मुलींना चांगले संस्कार दिले, शिकवून मोठे केले आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, त्याच वडिलांच्या शेवटच्या प्रवासात त्यांच्यासोबत राहण्यासाठी मुलींकडे वेळ नव्हता.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवचरण असे या दुर्दैवी वडिलांचे नाव असून ते गेल्या काही काळापासून एका वृद्धाश्रमात राहत होते. त्यांना अनिता, निशा आणि प्रिया नावाच्या तीन मुली आहेत, ज्यांच्या शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी त्यांनी आपली आयुष्यभराची कमाई खर्च केली होती. या तिन्हींपैकी दोन मुली शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिवचरण हे आजारी असताना सतत आपल्या मुलींची वाट पाहत असायचे. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत आपल्या मुलींना एकदा डोळे भरुन पाहावे, एवढीच त्यांची माफक इच्छा होती.

Staff at an old age home performing the last rites of an elderly man
Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

वृद्धाश्रम प्रशासनाने सुमारे वीस दिवसांपूर्वीच मुलींना त्यांच्या वडिलांच्या खालावलेल्या प्रकृतीची कल्पना दिली होती, जेणेकरुन त्या वेळेत भेटू शकतील. परंतु, दुर्दैवाने एकही मुलगी वडिलांना भेटायला आली नाही आणि शिवचरण यांची ही इच्छा अपूर्णच राहिली.

Staff at an old age home performing the last rites of an elderly man
VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

काही दिवसांपूर्वी शिवचरण यांचे वृद्धाश्रमातच निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी मुलींना देण्यात आली, मात्र वडिलांच्या निधनानंतरही तिन्ही मुलींपैकी कोणीही वृद्धाश्रमात पोहोचले नाही. जेव्हा आश्रम प्रशासनाने अंतिम संस्काराबाबत विचारणा केली, तेव्हा मुलींनी आपल्या व्यस्ततेचे कारण पुढे करत येण्यास असमर्थता दर्शवली. एवढेच नव्हे तर, त्यांनी अंतिम संस्काराच्या खर्चासाठी अवघे 5100 रुपये पाठवले आणि कर्मचाऱ्यांना अंत्यसंस्काराचा व्हिडिओ बनवून पाठवण्यास सांगितले. शेवटी, या मुलींनी स्वतः तिथे न येता थेट व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून वडिलांचा अंतिम संस्कार पाहिला.

Staff at an old age home performing the last rites of an elderly man
Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

आपला माणूस म्हणून कुटुंबातील एकही सदस्य न आल्यामुळे, अखेर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मुलाचे कर्तव्य बजावले. त्यांनी पूर्ण सन्मानाने शिवचरण यांची अंत्ययात्रा काढली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. हा प्रसंग पाहून तिथे उपस्थित असलेल्या अनेकांचे डोळे पाणावले. ही हृदयद्रावक घटना इथेच संपली नाही; अंत्यसंस्कार झाल्यानंतर जेव्हा वडिलांच्या अस्थी घेण्याची वेळ आली, तेव्हाही मुलींनी त्या स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी आश्रम प्रशासनालाच या अस्थी गंगा नदीत प्रवाहित करण्याची विनंती केली.

Staff at an old age home performing the last rites of an elderly man
Train Puja Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये चक्क दिवा लावून पूजा; प्रवाशांनी रोखलं तरीही हट्ट कायम, व्हिडिओ होतोय व्हायरल

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून या मुलींच्या वर्तनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही केवळ एका कुटुंबाची कथा नसून, बदलत्या सामाजिक मूल्यांची आणि वृद्धांच्या वाढत्या एकाकीपणाची भीषण वास्तवता दर्शवणारी घटना ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com