असानी' चक्रीवादळाने दिशा बदलली; 5 जिल्ह्यांना हाय अलर्ट

उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेशकडे वळवली दिशा
Asani Cyclone
Asani CycloneDainik Gomantak
Published on
Updated on

असानी' चक्रीवादळाच्या प्रभावाने 10 मे रोजी मुसळधार पाऊस कोसळला होता. यामुळे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये जनजीवन विस्कळीत होत 6 बोटी बुडाल्या होत्या. काल चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत इंडिगोने विशाखापट्टणम विमानतळावर येणारी आणि जाणारी तब्बल 23 उड्डाणं रद्द केली होती. याच असानी' चक्रीवादळ उत्तर किनारपट्टी असलेल्या आंध्र प्रदेशकडे वळवले आहे. ( Cyclone Asani changes direction, 5 districts of Odisha on high alert )

बुधवारी दुपारपासून संध्याकाळपर्यंत वादळाने पुन्हा एकदा वेग धारण केला होता आणि हळूहळू नरसापूर, यनम, काकीनाडा, तुनी आणि विशाखापट्टणम किनारपट्टीसह उत्तर-ईशान्य दिशेने आणि रात्री उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून पश्चिम-मध्य बंगालच्या दिशेने सरकत आहे.

Asani Cyclone
दम असेल तर ताजमहलचं मंदिर बनवून दाखवा - मेहबूबा मुफ्ती

आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उद्या म्हणजेच गुरुवारी येथे विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जेनामनी म्हणाले की, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ओडिशातील 5 जिल्ह्यांना हाय अलर्ट

ओडिशा सरकारने मलकानगिरी, कोरापुट, रायगडा, गंजम आणि गजपती या पाच दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये 'हाय अलर्ट' घोषित केला आहे. ओडिशापासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या काकीनाडा आणि विशाखापट्टणम दरम्यान पोहोचणाऱ्या या भागात चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे.

काय बदल केले असनी चक्रीवादळाने

असनी चक्रीवादळामुळे खराब हवामानामुळे बुधवारी विझाग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 95% पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली. फक्त स्पाईसजेट आणि स्कूट एअरलाइन्सने रात्री उशिरा त्यांच्या सेवा चालवण्याचा निर्णय घेतला. विझाग विमानतळावरील 30 पैकी 28 येणारी आणि जाणारी विमानं कंपन्यांनी रद्द केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com