CRPF मध्ये आत्महत्येच्या घटना वाढल्या, 23 दिवसांत 10 जवानांनी संपवली जीवनयात्रा!

CRPF: गेल्या 23 दिवसांत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 10 जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यात यासंबंधीची नोंद झाली आहे.
CRPF
CRPFDainik Gomantak
Published on
Updated on

CRPF: गेल्या 23 दिवसांत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 10 जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यात यासंबंधीची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सीआरपीएफ जवानांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. 2018 ते 2022 दरम्यान सीआरपीएफमध्ये आत्महत्येच्या 194 प्रकरणांची नोंद झाली होती.

दरम्यान, गेल्या 23 दिवसांत झालेले 10 मृत्यू सीआरपीएफच्या विविध शाखांमध्ये - विशेष शाखा, नक्षलविरोधी युनिट कोब्रा आणि जम्मू आणि काश्मीर युनिट, आसाम, ओडिशा, झारखंड, पुलवामा आणि श्रीनगर सारख्या ठिकाणी आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्यांमध्ये कोब्रा फोर्सच्या इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मृत्यूचाही समावेश आहे.

CRPF
CRPF: दहशतवाद्यांचा बिमोड करणार महिला कमांडो सज्ज, सैन्य ऑपरेशनमध्ये...

अमित शाह यांनी चिंता व्यक्त केली होती

वाढत्या आत्महत्तेच्या मुद्द्यावर सर्व स्तरातून चर्चा झाली असून नुकतेच चिंतन शिबिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली होती. सैनिकांमधील वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी पर्यवेक्षक अधिकारी प्रयत्न करतील.

CRPF
Jammu and Kashmir: पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा CRPF तुकडीवर हल्ला, चकमकीत जवान शहीद

अधिकृत आकडेवारीनुसार, 2018 ते 2021 या चार वर्षांच्या कालावधीत CRPF जवानांच्या आत्महत्यांमध्ये चिंताजनक वाढ नोंदवण्यात आली आहे. 2018 मध्ये 36 जवानांनी आत्महत्या केली, तर 2019 मध्ये 40 सैनिकांचा मृत्यू झाला. 2020 मध्ये, दलात आत्महत्येमुळे 54 मृत्यूची नोंद झाली. 2021 मध्ये 57 सैनिकांनी आत्महत्या केली. 2022 मध्ये सैनिकांच्या आत्महत्येमध्ये घट नोंदवली गेली होती, परंतु अद्याप ही संख्या 43 वर आहे.

यावर्षी 12 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान 10 जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत CRPF मध्ये आत्महत्या झालेल्या 34 मृत्यूंपैकी 30% मृत्यू गेल्या 10 दिवसांत झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com