Punjab Crime News : पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये एका प्रेमी युगुलाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण विक्रांत मसिहने जर्मनीला जाण्यासाठी नातेवाईकांना 24 लाख रुपये दिले होते. मात्र, त्याचे नातेवाईक त्याला परदेशात पाठवत नव्हते तसेच पैसेही परत करत नव्हते. यामुळे तो खूप अस्वस्थ होता.
विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर तरुणाने याची माहिती प्रेयसी नेहाला लगेच दिली. हे ऐकून नेहाचेही भान सुटले आणि तिनेही विषारी द्रव्य प्राशन करून जीव दिला.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे प्रेमी युगुल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि दोघांनाही जर्मनीत स्थायिक व्हायचे होते.
मृत विक्रांत मसिह याचा भाऊ रोहित मसिह याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या भावाने जर्मनीला जाण्यासाठी 24 लाख रुपये नातेवाईकांना दिले होते. मात्र नातेवाईक त्याला परदेशात पाठवत नव्हते आणि पैसेही परत करत नव्हते.
नेहालाही विक्रांतसोबत परदेशात जायचे होते. पण, नातेवाईकांच्या विश्वासघातामुळे दोघेही परदेशात जाऊ शकले नाहीत. पोलिसांनी मृत तरुणाच्या चार नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृतांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. तपासानुसार पुढील कारवाई केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.