Justice BR Gavai: ''आंबेडकरांमुळेच मी न्यायाधीश झालो'', न्यायमूर्ती बी.आर.गवई स्पष्टच बोलले; 2025 मध्ये होणार CJI

Justice BR Gavai: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई लवकरच इतिहास रचणार आहेत. 2025 मध्ये ते भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच CJI होतील.
Justice BR Gavai
Justice BR GavaiDainik Gomantak
Published on
Updated on

Justice BR Gavai: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई लवकरच इतिहास रचणार आहेत. 2025 मध्ये ते भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच CJI होतील. विशेष म्हणजे या पदावर विराजमान होणारे ते दलित समाजातील दुसरे व्यक्ती असतील. न्यायाधीश होण्याचे श्रेय ते भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांना देतात. आंबेडकरांमुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो, असे ते म्हणतात. सोमवारी आंबेडकर स्मृती व्याख्यानादरम्यान न्यायमूर्ती गवई म्हणाले की, ''भारतीय राज्यघटनेचे श्रेय डॉ. बी.आर. आंबेडकरांना जाते. डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्यामुळेच निमझोपडपट्टी भागातील महापालिकेच्या शाळेत शिकलेली माझ्यासारखी व्यक्ती या पदापर्यंत पोहोचू शकली.'' या कार्यक्रमात त्यांच्यासोबत न्यायमूर्ती ए.एस.ओकही उपस्थित होते.

दरम्यान, न्यायमूर्ती ओक यांनी विशेषत: कलम 32 चा उल्लेख केला. ते म्हणाले की, ''काही लोक म्हणतील की सर्वोच्च न्यायालयाने कलम 32 च्या सर्व याचिका उच्च न्यायालयात न पाठवता त्यांची सुनावणी करावी, परंतु आम्ही आदर्श जगात राहत नाही आणि प्रकरणे प्रलंबित नसती तर चित्र वेगळे असते. सर्वोच्च न्यायालयात 80 हजार खटले प्रलंबित आहेत.''

Justice BR Gavai
Supreme Court: "निवडणुकीपूर्वी किती लोक तुरुंगात जातील?", सुप्रीम कोर्टाने YouTuber सत्ताईचा जामीन केला मंजूर

ते पुढे म्हणाले की, 'आम्ही केवळ घटनात्मक न्यायालय नाही तर अपील न्यायालयही आहोत. जेव्हा कामे वाढतात तेव्हा आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागतो.' ते पुढे असेही म्हणाले की, “असेही कैदी आहेत ज्यांना कायमची माफी नाकारण्यात आली आहे. पण असेही लोक आहेत ज्यांच्या वतीने वकिलांची मोठी टीम न्यायालयात येते. ते न्यायालयात असा युक्तिवाद करतात की, कलम 19(1)(g) चे उल्लंघन झाले आहे. मग सामान्य गुन्हेगार आणि अशा व्यक्तींमध्ये कशी समानता आणता येईल.''

दरम्यान, कलम 32 अन्वये घटनेने दिलेल्या अधिकारांपासून कोणी वंचित राहिल्यास तो नागरिक सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com