7 ते 11 वयोगटातील मुलांना मिळणार लस, DCGI ने Kovovax ला दिली मंजूरी

कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशवासियांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
Vaccine
VaccineDainik Gomantak

Corona Vaccine For Children: कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशवासियांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने मंगळवारी काही अटींसह सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवोव्हॅक्स लसीला मंजूरी दिली आहे. ही लस 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाईल. DCGI ने मर्यादित आपत्कालीन वापरासाठी ही मान्यता दिली आहे. (Corona Vaccine For Children Under 7 to 11 Years Approved By DCGI)

डीसीजीआयने मंगळवारी औषधाला मंजूरी दिली

गेल्या आठवड्यात सरकारच्या कोविड तज्ञ समितीने या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती. ज्यानंतर DCGI ने मंगळवारी ही घोषणा केली. यापूर्वी, 16 मार्च रोजी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि नियामक व्यवहार संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी या संदर्भात DCGI ला एक विनंती पत्र दिले होते.

Vaccine
कोरोना महामारी एका वर्षात संपणार?; प्रसिद्ध लस उत्पादकाने केला दावा

7 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण

DCGI ने यापूर्वी 28 डिसेंबर रोजी प्रौढांसाठी आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापरासाठी Kovovax ला मान्यता दिली होती. 9 मार्च रोजी 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी काही अटींसह मान्यता देण्यात आली. भारताने 16 मार्च रोजी 12-14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु केले. अशाप्रकारे आता देशात 7 वर्ष ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी ही लस देण्यात येणार आहे.

Vaccine
Black Fungus: राजस्थानात महामारी म्हणून घोषित 

कोरोनाबाधितांमुळे सरकारची चिंता वाढत आहे

देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढल्याने सरकार चिंतेत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvia) यांनी नुकतीच देशातील आरोग्य सचिवांची बैठक घेऊन त्यांना या मुद्द्यावर सतर्क राहण्यास सांगितले होते. सरकारच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत नव्या रुग्णात कोरोनाची लक्षणे फारच कमी दिसत आहेत. कोणाचीही प्रकृती अधिक गंभीर होत नाही. तरीसुद्धा, सरकारांना बेड, ऑक्सिजनसह सर्व तयारी व्यवस्थित ठेवावी लागेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com