देशभरात सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण

देशभरात कोरोना फैलाव वाढला
India Corona Update
India Corona UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : सुमारे दोन वर्षे कोरोनाने संपुर्ण जगभरात थैमान घातले होते. या पार्श्वभुमीवर देशभरातील नागरीकांचे ही जीवन विस्कळीत झाले होते. यानंतर मात्र गेल्या काही दिवसापासून कोरोना संसर्गाचा फैलाव कमी झाला आहे. त्यामुळे जनजीवन पुर्वपदावर येत आहे. सद्या मात्र काहीशी चिंताजनक बातमी समोर येत आहे. कारण देशात सलग दुसऱ्या दिवशी 24 तासात दोन हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.{Corona spread in the country}

India Corona Update
धक्कादायक! तेलंगणातील विद्यार्थ्यांची दारु पार्टी, चौकशी सुरु

आज गुरुवारी देशात 2 हजार 380 नवे रुग्ण आढळले असून 1 हजार 231 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला 13 हजार 433 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. याआधी बुधवारी देशात 2 हजार 67 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. सरकारी डेटानुसार, गुरुवारी सकाळी पॉझिटिव्हिटी रेट 0.53 टक्के आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 0.43 टक्क्यांवर आहे. गेल्या 24 तासात देशात जवळपास 4 लाख 50 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात सध्याच्या घडीला 187 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत.

देशाची राजधानी दिल्लीतही कोरोना फैलावाचा वेग वाढला

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना देशाची राजधानी दिल्ली येथे मात्र कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये काल बुधवारी एक हजारापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळले असुन. यासोबत शहरात 10 फेब्रुवारीनंतची सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

India Corona Update
सचिन पायलट सोनिया गांधींच्या भेटीला, हायकमांड ठरवणार नवी भूमिका

उत्तर प्रदेशातही कोरोना अलर्ट जारी

देशभरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिफारशी करत अधिकाऱ्यांना कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा आदेश दिल्याने उत्तर प्रदेशात ही कोरोना अलर्ट जारी केल्याचे चित्र आहे. या पार्श्वभुमीवर लखनऊ आणि एनसीआरमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गोवा राज्यात ही मास्कमुक्त गोवा जाहीर केलेले नसले तरी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लवकरच ती जाहीर करणार असले तरी अद्याप ती जाहीर केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com