Viral Photo: पतंप्रधान मोदी अन् राहुल गांधींचा 'हा' फोटो होतोयं व्हायरल,वाचा काय आहे कारण

Viral Photo: देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
PM Modi | Rahul Gandhi | PM Modi Video Viral | Rahul Gandhi and Sonia Gandhi Video Viral
PM Modi | Rahul Gandhi | PM Modi Video Viral | Rahul Gandhi and Sonia Gandhi Video Viral Dainik Gomantak
Published on
Updated on

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पंतप्रधान मोदींचे (PM Modi) अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते मास्क घातलेले दिसत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी 'भारत जोडो यात्रे'दरम्यान मास्कशिवाय फिरताना दिसत आहेत.

  • मोदी मास्क घालून, तर राहुल गांधी मास्कशिवाय, फोटो व्हायरल
    देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. शेजारी देश चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही त्याचा धोका निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 'मन की बात' मध्ये त्यांनी लोकांना मास्क (Mask) घालण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'जगातील अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत असल्याचे आपण पाहत आहोत. म्हणूनच आपण सावधगिरी बाळगणे, मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे आवश्यक आहे.

पंतप्रधान मोदींचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये ते मास्क घातलेले दिसत आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी आजही 'भारत जोडो यात्रे' दरम्यान मास्कशिवाय फिरताना दिसत आहेत. दरम्यान, राहुल गांधींचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते 'मास्क वापरा, प्रवास करू नका, कोविड पसरत आहे... हे सर्व बहाणे आहेत' असे म्हणताना दिसत आहे, राहुल गांधी जेव्हा आई सोनिया गांधी यांना भेटले, तेव्हा त्यांच्या आईने मास्क घातलेला होता. अशा स्थितीत खुद्द राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

  • नेटकऱ्यांकडून राहुल गांधींवर टीका
    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर लोक राहुल गांधींवर टीका करताना आहेत. कोणी म्हणतंय की 'मास्क घाला आणि सगळ्यांना ते घालायला सांगा. तुम्ही काय देशाचे PM होणार?', तर कोणी म्हणतंय की 'मास्क घातला नाही'. प्रवासादरम्यान एखाद्या व्यक्तीला काही झाले तर त्याला जबाबदार कोण?'

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संसर्गामुळे चीनमधील स्थिती बिघडली आहे. 20 दिवसांत 24 कोटी चिनी नागरिकांना संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे आणि भारतातही हा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com