देशात आठवडाभरानंतर पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झाली वाढ

तिसर्‍या लाटेत कोरोना व्हायरस खूपच कमकुवत झाला आहे.
Corona
CoronaDainik Gomantak
Published on
Updated on

तिसर्‍या लाटेत कोरोना व्हायरस खूपच कमकुवत झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. मात्र, आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत अपडेट जारी केले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 15,102 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अहवालानुसार, या कालावधीत 31,377 लोक बरे झाले आहेत, तर 278 लोकांचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाला आहे. काल, बुधवारी देशात कोरोनाचे एकूण 13,405 रुग्ण आढळले आहेत. (Corona Cases In India Latest News)

Corona
युक्रेनमधून परतलेल्या 242 भारतीयांनी व्यक्त केली व्यथा

गेल्या 24 तासात भारतात COVID19 चे 15,102 नवीन रुग्ण आढळले आहेत, 31,377 बरे झाले आहेत आणि 278 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण प्रकरणे: 4,28,67,031

सक्रिय प्रकरणे: 1,64,522

एकूण रिकव्हरी: 4,21,89,887

एकूण मृत्यू: 5,12,622

एकूण लसीकरण: 1,76,19,39,020

सक्रिय प्रकरणे देखील कमी झाली

याशिवाय, कोरोनाचे सक्रिय रुग्ण आता 1,64,522 पर्यंत कमी झाले आहेत. आतापर्यंत एकूण 4,21,89,887 लोक बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 4,28,67,031 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 5,12,622 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com